प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना खा.हेमंत पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी दिल्ली येथे केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी लाक्षणिक उपोषण सुरू: महाराष्ट्रातील एकूण 48 खासदारांपैकि आरक्षणासाठी राजीनामा देणारे एकमेव खासदार

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड/ हिंगोली : हिंगोली जिल्हयाचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर लाक्षणिक उपोषण दि.31 ऑक्टोबर 2023 पासून सुरू केले आहे.
मराठा समाजास आरक्षण मिळावे तसेच हा प्रश्न देशाच्या राजधानीत गांभीयाने, घ्यावा, यासाठी खा.पाटील हे लाक्षणीक उपोषणास बसले आहेत.
शिवसेना खा हेमंत पाटील हे महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील हिंगोली भागाचे प्रतिनिधीत्व करतात.या भागात मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून या भागातील नागरिक कुणबी, कष्टकरी, कामगार, मजूर,कामगार म्हणून ओळखला जातो. या भागातील जमीन कोरडवाहू ,डोंगराळ सर्वसाधारण, आहे. नैसर्गिक आपत्ती, कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ , सतत शेतीची नापीकी, वातावरणातील बदल, शेत मालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे मोठ्या प्रमाणात शेतक त्यांच्या आत्महत्या होत आहेत. मराठा समाज आज अंत्यत गरीब परिस्थितीमध्ये हालाखीचे जीवन जगत आहेत. बेरोजगारीमुळे गावा गावात शेकडो तरुण वैफल्यग्रस्त जीवन जगत असून, अनेक कुटुंबातील मुलांच्या विवाहाची समस्या निर्माण झाली आहे .

गेल्या अनेक दिवसांपासून मनोज पाटील जरांगे अन्न-पाणी त्यागुन उपोषणास बसले असून त्यांच्या समर्थनार्थ गावा-गावातुन् हजारो युवक,पुरुष – महीला उपोषणास बसले आहेत.
या आरक्षणाचे गांभीर्य लोकसभेच्या व्यासपीठावर, केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी माझे कर्तव्य असून, यापूर्वी हा प्रश्न मी लोकसभेत अनेकदा उपस्थित केला असुन या प्रश्नावर महाराष्ट्रातील सर्वपक्षिय खासदारांची बैठकीत , 23 खासदार, या बैठकीस उपस्थित होते. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळवून देण्यासाठी या प्रश्नाचे गांभीर्य केंद्र सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी कालच मी लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्याकडे माझा राजीनामा दिला आहे.मराठा समाजाच्या बाजूने आरक्षणासाठी आणि श्री मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देत आहे.त्यासाठी राजधानी दिल्लीत उपोषणास बसलो आहे. मौनव्रत धारण करून हे उपोषण करत आहे. असे खा.हेमंत पाटील यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.