प्रतिष्ठा न्यूज

ढवळी गायरानात झालेल्या मुरूम उत्खननाचा प्रशासनाने केला पंचनामा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी मनसेच्या वतीने ढवळी गावातील गायरान मधील मुरूम अवैद्यरित्या विनायक लुगडे याने उत्खनन केले आहे अशी तक्रार तहसीलदार तासगाव याना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी मंडल अधिकारी अभयकुमार शेटे यांना कारवाईचे आदेश दिले होते. तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी यांनी ढवळी गायरानातून उत्खनन केलेल्या जागेचा आज पंचनामा केला.यावेळी ढवळी गावकामगार तलाठी मुलाणी,तुरची गावकामगार तलाठी कुंभार हे ही कारवाई करताना उपस्थित होते. तसेच पंचनाम्यावर पंच म्हणून ढवळी गावचे पोलीस पाटील भागवत गुरव ( मेजर),ढवळी विकास सोसायटीचे संचालक महादेव चव्हाण व मनोज पाथरवट हे यावेळी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.