प्रतिष्ठा न्यूज

कुंभी प्रकल्पात ९३ टक्के पाणीसाठा

प्रतिष्ठा न्यूज 
गगनबावडा वार्ताहर, ता. 6 : पावसाचे आगार, अति पावसाचा तालुका म्हणून गगनबावडयाची ओळख. गगनबावडा तालुक्यात सरासरी  5500 मि.मी. प्रतिवर्षी पाऊस पडतो.कुंभी मध्यम प्रकल्पात ९३. ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. तालुक्यातील कोदे, वेसरफ,अंदुर हे लघु प्रकल्प जुलैमध्येच भरले आहेत.  लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प मधून गगनबावड्यासह पन्हाळा,करवीर तालुक्यातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येते. उन्हाळ्यात बॅकवॉटर पद्धतीने धामणी खोऱ्यातील गावांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होतो.

आज अखेर कुंभी प्रकल्पात

⚫ पाणी पातळी………. ६.११ मिटर
⚫  संचय क्षमता……….७६. ८८ द.ल.घ.मी.
⚫ संचय क्षमतेच्या..९३.७५ % पाणीसाठा
⚫ प्रकल्प क्षेत्रात पाऊस….. ३८१३ मि.मी.
⚫विद्युत ग्रह विसर्ग…………३०० क्युसेक
⚫ पाण्याखाली बंधारे……… शेनवडे

सोबत फोटो : लखमापूर : कुंभी मध्यम प्रकल्प

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.