प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रताप… शासकीय विश्रामगृहातील २५ झाडांची कत्तल

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : एकीकडे शासन झाडे लावा व झाडे जगवा हे बोंबलून सांगत असताना तासगाव शासकीय विश्रामगृहातील अशोक वृक्षांच्या २५ झाडांची कत्तल तासगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी तासगाव तालुक्यातील वृक्षप्रेमींनी केली आहे.
वृक्षतोडीचे जागतिक तापमान वाढीचे चटके सर्वसामान्यांना बसत आहेत. अवेळी येणारा पाऊस,पूर,दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होत असून शास्त्रज्ञ वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे,झाडे लावा असे सांगत आहेत.शासन स्तरावर वृक्ष लागवडीसाठी अनेक मोहिमा हाती घेत वृक्ष लागवड करण्यास व ते जगण्यासाठी लोकांना प्रेरित करत आहे.पंचायत समिती मार्फत वृक्ष लागवडीचा बिहार पॅटर्न राज्यभरात वापरला जातो.मात्र हा बिहार पॅटर्न व त्याचे अंमलबजावणी करणाऱ्या तासगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी अशोक या वृक्षाच्या झाडांची कत्तल केली आहे.तासगाव येथील शासकीय विश्रामगृहात गेले १५ ते २० वर्षे वयाची ही झाडे अर्ध्यातून कापून टाकण्यात आली आहेत.मुळात या झाडांचा त्रास कुणालाही होत नव्हता व त्याची सावली ही भरपूर वाढली होती.मात्र झाडावर पक्षी बसून घाण करतात इतर ठिकाणच्या गाड्या या सावलीत लागतात या मानसिकतेतून ही झाडे तोडल्याचे पंचायत समितीतील काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.यापूर्वीही पंचायत समितीच्या शासकीय विश्रामगृह आसपास अनेक झाडे होती मात्र रासायनिक प्रक्रिया करून या पंचायत समिती विश्रामगृहातील काही मंडळींनी ही झाडे मारून टाकली.हा गंभीर प्रकार असून याबद्दल वृक्षप्रेमी याबद्दल संताप व्यक्त केला. माहितीसाठी संपर्क साधला असता गटविकास अधिकारी संताजी पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
चौकट
कारवाई करा:कुंडलिक देशमुख
निसर्गाचा असमतोल झाला असताना  वृक्षतोडी विरुद्ध सर्वांनी दोन हात करण्याची गरज आहे. झाड लावण्याचा संदेश देणारी शासकीय यंत्रणाच वृक्ष तोडत असेल तर  हे गंभीर असून चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते कुंडलिक देशमुख यांनी केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.