प्रतिष्ठा न्यूज

जिल्हा परिषद शाळा मौजे जाकापूर येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी चालवली प्रारूप शाळा: पालकांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
कंधार : जि.प.प्राथमिक शाळा जाकापूर ता.कंधार येथील इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा केला.
 यावेळी  प्रारुप शाळेच्या कु. पल्लवी हणमंत शिरसे हिने मुख्याध्यापक, तर  प्रवीण हणमंत जाधव याने उपमुख्याध्यापक म्हणून तसेच इतर विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.एक दिवस शिक्षक म्हणून शिकवताना विद्यार्थ्यांची दमछाक होत होती.त्यांना एक नवीन अनुभव मिळाला..सेवक म्हणून स्वराज ज्ञानेश्वर जाधव या विद्यार्थ्यांने आपले काम चोखपणे बजावले.शेवटी विद्यार्थ्यांचे मनोगत झाली.आपले अनुभव सांगताना काही विद्यार्थी धीरगंभीर तर काहींनी विनोदी अनुभव सांगितले..आजचा दिवस कसा गेला हे त्यांना समजलेच नाही.एक आगळावेगळा अनुभव त्यांना यानिमित्ताने मिळाला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक,शा.पो.आहार कर्मचारी,अंगणवाडी ताई,मदतनीस,शालेय व्यवस्थापण समिती सदष्य आदींनी परिश्रम घेतले.अल्पोपहार व मिठाई वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली..कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक श्री सी.आर.चाटे.सहशिक्षक श्री सोळुंके सर ,श्रीमती ताराबाई पवार, अंगणवाडी ताई भारतबाई वाघमारे,सेविका चऊत्राबाई वाघमारे, ग्राम शिक्षण समिती सदस्य, पालकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्रारूप शाळा (स्वंयशासन दिन) चालविल्या बद्दल कौतुक केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.