प्रतिष्ठा न्यूज

सावित्री-जिजाऊ दशरात्रौत्सव निमित्ताने मराठा वधू वर मेळावा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सावित्री -जिजाऊ दशरात्रौत्सव निमित्ताने आज दि. ७ जानेवारी रोजी मराठा वधू वर मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रथमतः डाॅ. सरोजिनी बाबर याना जयंती निमित्त अभिवादन करून राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्याप॔ण करण्यात आले.सांगली/कोल्हापूर जिल्ह्यातील पालक, विवाह च्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानी आपली माहिती देऊन अपेक्षित जोडीदाराबद्दल मतं व्यक्त केली. आपसातील प्रत्यक्ष चर्चेमुळे सदर मेळाव्याचा खूप फायदा झाल्या चे संबंधितांनी आपल्या मनोगतातून सांगितले.इंजि.ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता यांनी अध्यक्षीय भाषणात सद्यस्थितीत विवाह जमविताना कालबाह्य रुढी परंपरा सोडून समाजाने कालसुसंगत निर्णय घेण्याचे आवाहन केले. लग्नामुळे दोन कुटुंबं एकत्र येतात तेथे व्यवहार नसावा व दोन्ही बाजूंनी एकमेकांशी आदराने वर्तन केल्यास सामाजिक सलोखा वाढणेस मदत होईल. नोकरी, व्यवसाय सांभाळून कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता येतात असे स्वानुभवातून त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास मसेस जिल्हाधक्ष सचिन पवार, अमृतराव सूर्यवंशी, प्रणिता पवार,योजना शिंदे देवजी साळुंखे, बाळासाहेब लिपाणे-पाटील उपस्थित होते. योजना शिंदे, रूपाली पाटील यांनी संपूर्ण नियोजन करून मेळावा यशस्वी केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.