प्रतिष्ठा न्यूज

संस्कार भारती सांगली तर्फे देशभक्तीपर नाट्याचे अभिवाचन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्वराज्य 75 निमित्त कार्यक्रमाचा एक भाग म्हणून संस्कार भारती,सांगली जिल्हा समिती तर्फे भवानी मंदिर या देशभक्तीपर नाटकाचे अभिवाचन नुकतेच सादर करण्यात आले.
सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री.राजेंद्र पोळ उपस्थित होते.दीपप्रज्वलन व आस्था ओगले यांनी गायलेल्या संस्कार भारती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.श्री.राजेंद्र पोळ यांनी आपल्या भाषणात संस्कारांचे महत्व विषद करून वाचन संस्काराशिवाय समाज वाचणार नाही असे आवर्जून सांगितले.कलेच्या माध्यमातून संस्कार भारती करत असलेल्या संस्कारांचे त्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
यानंतर सौ.विनिता तेलंग लिखित
‘भवानी मंदिर’ या नाटकाचे अभिवाचन झाले.
सौ.कल्याणी गाडगीळ यांनी दिग्दर्शित केलेल्या या अभिवाचनात ऋतूराज कुलकर्णी,पार्थ खाडीलकर,ऋषी पाटील,उत्कर्षा लिमये,सृष्टी करंदीकर *आणि* यशोधन गडकरी यांनी सहभाग घेतला होता.सौ.गीता दातार यांनी नांदी सादर केली.प्रसाद दातार यांनी पार्श्वसंगीत दिले होते. या कार्यक्रमास संस्कार भारती सांगली जिल्हा अध्यक्ष श्री.माधव वैशंपायन,संस्थेचे पदाधिकारी ,नाटककार अरविंद लिमये व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
अध्यक्ष माधव वैशंपायन यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. भालचंद्र चितळे यांनी पोळ सरांची ओळख करून दिली. कार्येक्रम प्रमुख कल्याणी गाडगीळ यांनी आभार मानले. निवेदन प्रिया गडकरी यांनी केली. अमित मराठे, विसुभाऊ कुलकर्णी, मिलिंद महाबळ,संतोष बापट, सुहास पंडित, शेखर गोरे, परागेश जोशी, विवेक गाडगीळ हि पण सर्व उपस्तित होती. सर्व नाटक प्रेमींनी याला छान प्रतिसाद दिला

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.