प्रतिष्ठा न्यूज

आनंदी शिक्षण संस्थेत बार कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडून विधी महाविद्यालयास मान्यता

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फ कळे या संस्थेला बार कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडून विधी महाविद्यालयास सन २०२४-२५ पासून मान्यता देण्यात आली. या मान्यतेचे पत्र संस्थेचे अध्यक्ष सतिश देसाई यांना संस्थेच्या सचिव विद्या देसाई यांच्याकडे सुपूर्त केले. महाराष्ट्र शासन यांच्याकडून व शिवाजी विद्यापीठाकडून प्राथमिक संलग्निकरणही प्राप्त झाले आहे.
यावेळी अध्यक्ष देसाई यांनी बोलताना ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना कायद्याचे शिक्षण मिळणे गरजेचे असून त्यांना शासकीय किंवा अन्य विभागात नोकरी मिळाली पाहिजे.या उद्देशाने सदर विधी महाविद्यालय सुरु केले असल्याचे सांगितले . तसेच बरेच दिवसापासून विध्यार्थी व पालक वर्गातून वारंवार सदर कोर्स सुरु करण्याबाबत मागणी केली जात होती. त्याची पूर्तता केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सतिश देसाई व सचिव डॉ विद्या देसाई यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तर सर्व परिसरातील विध्यार्थ्यांनी विधी कोर्सला प्रवेश घेण्याचे आवाहन यावेळी अध्यक्षांनी केले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. विद्या देसाई, आनंदी महाविद्यालयाचे प्रा. डॉ टी. एम. पाटील, डॉ. प्रा.एस. एस. पानारी, प्रा. आदिनाथ कांबळे,प्रा. डॉ. सुरेश किल्लेदार, डॉ. आर. एस. आडनाईक, प्रा. एस.एस. पाटील सर्व कर्मचारी व विद्यार्थी पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.