प्रतिष्ठा न्यूज

दंडोबा येथे १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली व रोटरी क्लब मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
मिरज : दंडोबा येथे १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली व रोटरी क्लब मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमात १६ महा. बटालियन एनसीसी, मातोश्री तानुबई दगडु खाडे इंग्लिश स्कूल मिरज , मिरज हायस्कूल मिरज, बळवंतराव मराठे विद्यालय मिरज, एस. एम. हायस्कूल मालगाव, कर्मवीर विद्यालय म्हैसाळ या विद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी  वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. वन विभागाकडून मिळालेल्या ११० झाडांचे रोपण यावेळी करण्यात आले . मंदिर परिसरात यात्रेमुळे झालेला कचरा स्वच्छ करण्यात आला.
  या कार्यक्रमासाठी कर्नल चंद्रशेखर साठ्ये, अभिजित बर्वे, एस. एम. संजय लेंडवे, रवींद्र फडके, बाळासाहेब जाधव, रियाज मुजावर, अभिजित हिवरेकर, कृष्णदेव सावंत, राहुल भंडारे, कृष्णा हलवान, विक्रांत गौंड उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.