प्रतिष्ठा न्यूज

लिंबगावचे जेष्ठ नागरिक नानाराव (नानादेव)यांचे निधन: शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट

नांदेड : तालुक्यातील लिंबगाव येथील जेष्ठ नागरिक नानाराव धोडजी कदम ( नानादेव ) यांचे दि. 25 जानेवारी 2023 रोज बुधवारी निधन झाले असुन मृत्यूसमयी त्यांचे वय 75 वर्षे होते. त्यांच्यावर लिंब गाव येथील स्मशानभूमीत दुपारी 1 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेले कै. नानाराव कदम यांना लिंबगाव परिसरात “नानादेव” या टोपण नावाने ओळखत होते. ते शिवशंभू महादेवाचे निश्चयी भक्त होते, म्हणुन त्यांनी कधीही डोक्याचे व दाढीचे केस काढले नाहीत, तसेच मरेपर्यंत त्यांनी कोणत्याही ऋतुमध्ये पायात वाहन वापरले नाहीत. अशा या प्रेमळ कै. नानाराव कदम यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यविधीला सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुले, 2 सुना, नातु, पणतू असा मोठा परिवार असुन ते शंकर कदम व माधव (बाळू) कदम यांचे वडील होत, तर नाशिक येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यस्थापक अरुनराव कदम यांचे चुलते (काका) होत.
●प्रतिष्ठा न्युज कडुन भावपुर्ण श्रद्धांजली💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.