प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेला क्षयरोग उच्चाटन बाबत कास्य पदक : महापौर दिग्वीजय सुर्यवंशी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला क्षयरोग उच्चाटन बाबत कास्य पदक मिळाले आहे.
महानगरपालिका मा.आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि-22 डिसेंबर 2022 रोजी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ.सुनिल आंबोळे यांच्या उपस्थितीत सब नॅशनल सर्टीफिकेशन या मोहिमेचे उदघाटन झाले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी व शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मंजूषा दोरकर यांच्या देखरेखी खाली सदर मोहिम पार पडली. डॉ.माधव ठाकूर व डॉ.विजय ऐनापुरे यांनी या सर्वेक्षणासाठी विशेष परिश्रम घेतले. श्री.नितिन देसाई व सपना देशपांडे यांनी नोडल ऑफिसर म्हणून काम पाहिले. क्षयरोग विभागांतर्गत काम करीत असलेल्या कर्मचारी यांनी देखील मेहनत घेतली. त्यामुळे सांगली ग्रामीण व सां.मि.कु.महापालिकेस कास्य पदक हे बक्षीस मिळाले आहे अशी माहिती सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शहर क्षयरोग अधिकारी डॉ.सौ.मंजूषा शशिकांत दोरकर यांनी दिली.
दि-22 डिसेंबर 2022 रोजी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व सांगली ग्रामीण यांचा सब नॅशनल सर्टीफिकेटसाठी एकत्र सर्वेक्षण झाले महानगरपालिकेतील दोन वॉर्ड मध्ये दि-14 जानेवारी 2023 पर्यंत सर्व्हे करणेत आला. यामध्ये शासकीय संस्था व खाजगी क्षेत्रामधील क्षयरोग प्रतिरोधक औषधांचा खप आणि क्षयरुग्ण तपासणी करण्यासाठी किती रुग्णांची तपासणी केली याची पडताळणी जागतिक आरोग्य संघटना व भारतीय जन औषध वैद्यकशास्त्र संघटना यांच्या प्रतिनिधींकडून केली गेली. आरोग्य मंत्रालय सरकारकडील केंद्रीय क्षयरोग विभागाकडून सदर आहावालाचे पुनरावलोकन करुन क्षयरुग्णांची 20% घट झाल्यामुळे प्रमाणपत्र निश्चीत केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय पातळीवर फक्त सांगली जिल्हा ग्रामीण व सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला एकमेव सन्मान प्राप्त झाला आहे.
महापौर श्री.दिग्वीजय सुर्यवंशी, उपमहापौर श्री. उमेश पाटील, अति. आयुक्त श्री.चंद्रकांत खोसे, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ.सुनिल आंबोळे, नगरसचिव श्री.चंद्रकांत आडके यांनी शहर क्षयरोग अधिकारी डॉ.मंजूषा दोरकर व एनटीईपी स्टाफ यांचे कार्याचे कौतुक केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.