प्रतिष्ठा न्यूज

मनीषा पाटील हरोलीकर यांना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : ‘नाती वांझ होताना’ या मनीषा पाटील हरोलीकर यांच्या कवितासंग्रहास साहित्य विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ‘ नुकताच जाहीर झाला .पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे पुरुषोत्तम सदाफुले पाटील यांनी केली आहे.1 मे या आंतरराष्ट्रीय कामगार व महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नेरळ येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.तसेच नारायण सुर्वे यांच्या घरी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल,असे कळवले आहे.
मनीषा पाटील हरोलीकर यांच्या बहुचर्चित ‘नाती वांझ होताना’ या कवितासंग्रहास याअगोदर राजगुरुनगर येथील पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार ,नाशिक येथील साहित्यकणा पुरस्कार ,फलटण येथील धर्मवीर संभाजी पुरस्कार आणि कणेगाव येथील कै.विकास पाटील साहित्य पुरस्कार असे चार पुरस्कार मिळाले आहेत.अनेक समीक्षकांनी या संग्रहाचे कौतुक केले आहे.हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून या संग्रहाचे स्वागत होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.