प्रतिष्ठा न्यूज

जबरी चोरी करणाऱ्या तिघांना संजयनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जबरी चोरी करणाऱ्या तिघांना संजयनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या आहेत. सारंग दिलीप वारे वय १९ वर्षे, दिपक दगडू सकट वय १९ वर्षे, प्रतिक मनोज कांबळे वय १९ वर्षे सर्व रा चिंतामणीनगर, झोपडपट्टी, जुने आर टी ओ ऑफिसजवळ सांगली अशी आरोपींची नावे आहेत.
गुन्हयाची थोडक्यात हकीगत :-

वरील ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व साक्षीदार अमित महाडिक असे बोलत थांबले असता यातील आरोपी नं. १ ते ३ हे त्यांचे समोरून चालत येऊन आरोपी नं. १ याने फिर्यादीची वरील वर्णनाची गळयातील चैन जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेले आहेत म्हणून वगैरे.

वरील प्रमाणे गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सो. यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री बयाजीराव कुरळे व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीय लक्षात घेवुन घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा पंचशिलनगर, चिंतामणीनगर, संपत चौक परिसरामध्ये शोध घेत असताना यातील आरोपी नं. १ ते ३ यांनी सदरची चैन जबरदस्तीने चोरून घेऊन गेले असलेबाबतची गोपणीय बातमी मिळाली. सदर तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन सदर गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरची चैन जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेले असलेबाबतची कबुली दिली. सदरचा गुन्हा यातील आरोपी नं. १ ते ३ यांनी केले असलेबाबत तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलो आहे. सदर गुन्हयातील वरील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास बयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों / ७९ विनोद सांळुखे करीत आहेत.

कारवाई करणारे अधिकारी व अमंलदार*
पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव
यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री. बयाजीराव कुरळे यांचे आदेशान्वये, पोहेकॉ/१२७९ संतोष पुजारी, पोहेकॉ/१६७६ कपील सांळुखे, पोहेकॉ/१३३० नवनाथ देवकाते, पोकों/१३१ आकाश गायकवाड, पोकों/१६५१ सुशांत लोंढे, पोकॉ/६४४ मोहन सोनावणे व पोकॉ/९७१ सचिन वडगावे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.