प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेस कार्यकर्ता मनोज लांडगेचा वाढदिवस रक्तदान व शालेय साहित्य वाटपाने साजरा ; मनोजचा पिंडच मुळी समाजसेवेचा.. पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.१७ : मनोज लांडगे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता असून पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या सर्व लोकोपयोगी उपक्रमात हिरीरीने सहभागी असतात.हाती घेतलेले काम पूर्ण करणाऱ्या मनोजचा मूळ पिंडच समाजसेवेचा आहे. महापूर व कोरोना काळात त्यांनी पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या माध्यमातून उत्तम योगदान दिले आहे. प्रभाग क्र.८ मध्ये गोरगरीब मुलांना शैक्षणिक मदत, दवाखाना उपचारासाठी रुग्णांना सहाय्य, रस्ते व ड्रेनेज, महाआघाडी सरकारच्या काळात निधी उपलब्ध होण्यासाठी आमच्या माध्यमातून पाठपुरावा, अतीवृष्टी काळात नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यावेळी महापालिका प्रशासनाकडे आमच्या बरोबर आयुक्तांना भेटून दाद मागणी इ. कामात सतत अग्रेसर रहाणाऱ्या मनोज लांडगे यांचा वाढदिवस रक्तदान व चिमुकल्यांना शालेय दफ्तर वाटपाने होत आहे हा स्तुत्य उपक्रम आहे. या भागातील नाल्याचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करु. मनोजचे आम्ही अभिष्टचिंतन करुन त्यांना दीर्घायुरारोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सामाजिक कार्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या सीमाताईंचे अभिनंदन करतो असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले. ते मनोज लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.८मधील आनंदनगर येथे आयोजित अभिष्टचिंतन व रक्तदान आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मनोज व सीमा लांडगे यांचा शाल व बुके देऊन सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पृथ्वीराजबाबा आणि ॲड. विरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रक्तदाते यांचा सत्कार व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्जचे वाटप करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील आणि विरेंद्रसिंह पाटील यांचा प्रभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशांत देशमुख, विशाल सरगर, प्रा. उत्तम हराळे, दिनकर लांडगे, रवी खराडे,प्रशांत अहिवळे, अनिल व अजिंक्य मोहिते, तुकाराम चौगुले, गजानन बिसले,
प्रकाश पवार यशवंतनगर, बसाप्पा कोरती, अजित खरात, संदीप मोरे, सागर ओलेकर, अमोल गडदे, बाळासाहेब माने, महेश साळुंखे, अभिजित भंडारे, अशोक घोरपडे, डॉ. अमर पाटील, भोला माछरे, विशाल कांबळे, गजानन व शशिकांत तिरमारे, आदर्श व अंजली लांडगे, प्रमोद रुपनर, आकाश गोयकर, शरीफ शेख, शबीर शेख, अजिज मुलाणी, संजीवन हनुमान मंदिर अष्टविनायक नगरचे कार्यकर्ते व मनोजवर प्रेम करणारे हितचिंतक, मित्र मंडळी,नातेवाईक, वार्ड नं ८ व आसपासच्या वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.