प्रतिष्ठा न्यूज

थोर तपस्वी, युगपुरुषांच्या देशात सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, युवकांना न्याय मिळाला पाहिजे : खासदार राहुल गांधी

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार

नांदेड दि.10 : छत्रपती शिवाजी महाराज, म.गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पासून अनेक महान विभूती तपस्वी यांच्या विचार, शक्तीवर चालणारे राष्ट्र आहे. तपस्वी, राष्ट्रपुरुष यांचा देश आहे. मात्र आता शेतकरी, शेतमजूर, युवक यांच्या तपश्चर्येस यश मिळाले पाहिजे असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते, खा.राहुल गांधी यांनी केले. देशात नोटबंदी, जी.एस.टी.नी. लोकांचे रोजगार संपविण्याचे काम केले असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की,काळे धन आले नाही.फाॅक्सान आणि इतर प्रकल्प गुजरात ला गेले. राज्यात बेकारी वाढली.तसेच शालेय विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण मिळत नाही असे त्यांनी सांगितले. देशात भरपूर पैसा आहे मग शेतकऱ्यांना,युवकांना कर्ज का मिळत नाही असा सवाल त्यांनी केला.
प्रास्ताविक माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला खा.राहुल गांधी आणि मान्यवर उपस्थित पाहुणे यांनी छ.शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खडगे, ना.बाळासाहेब थोरात, सुशांत सिंग,श्री नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ना.जयंत पाटील यांनी मांडले.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खडगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील,खा.सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण, सुशांत सिंग, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, श्री नाना पटोले,श्री बाळासाहेब थोरात,श्री जितेंद्र आव्हाड, हुसेन दलवाई, इम्रान प्रतापगढी,माजी खा.व्यंकटेश काब्दे,आ.अमरनाथ राजुरकर,आ.मोहणराव हंबर्डे,आ.माधवराव पाटील पवार,आ.जितेश अंतापूरकर,माजी मंत्री श्री डी.पी.सावंत, माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या सह काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील जेष्ठ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आ.अमरनाथ राजूरकर तर आभार काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री गोविंदराव शिंदे नागेलिकर यांनी मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.