प्रतिष्ठा न्यूज

डॉ. सुनीलकुमार लवटे सत्कार समितीने दिली बालकल्याण संकुलला लाखाची मदत

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नागरी सत्कार समितीच्या वतीने बालकल्याण संकुलला एक लाख तर पंढरपूर येथील वा. बा. नवरंगे बालकाश्रमास ६७ हजाराचा धनादेश देण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल बावीस वर्षांनंतर बालकल्याण संकुलमध्ये डॉ. लवटे यांनी पाऊल ठेवले आणि कार्यक्रमाला भावनिकतेची किनार मिळाली.
डॉ. लवटे यांचा ऑक्टोबर महिन्यात कोल्हापुरात नागरी सत्कार करण्यात आला. यासाठी समाजातील अनेकांनी निधी दिला होता. कार्यक्रमासाठी यातील काही रक्कम खर्च झाली. उर्वरित रक्कम सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय सत्कार समितीच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार जेथे डॉ. लवटे यांचे बालपण गेले, ते नवरंगे हायस्कूल तसेच जेथे ते घडले त्या बालकल्याण संकुलास हा निधी देण्यात आला.
बालकल्याण संकुल येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा निधी प्रदान करण्यात आला. यावेळी संकुलचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद कार्यवाह पद्मा तिवले, नवरंगे बालकाश्रमाच्या अधीक्षिका राजश्री गाडे यांनी हा निधी स्वीकारला.
यावेळी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, सचिव विश्वास सुतार, खजिनदार प्रभाकर  हेरवाडे, पी. डी. देशपांडे, अनिल म्हमाने, सागर बगाडे आदि उपस्थित होते.
दरम्यान, बालकल्याण संकुलच्या जडणघडणीत डॉ. लवटे यांचा मोलाचा वाटा होता, पण काही कारणाने ते गेली बावीस वर्षे या संस्थेपासून ते दूर होते. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्ही. बी. पाटील यांच्या विनंतीला मान देऊन ते संस्थेत आले. संस्थेच्या सर्व शाखेत फिरून चौकशी केली. तेथे असलेल्या मुलांत ते रमले. यापुढेचे आयुष्य अनाथांसाठी खर्ची घालण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.