प्रतिष्ठा न्यूज

कुंडलमध्ये महिलांसाठी शोधूनही सापडत नाही स्वच्छतागृह ; ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षमतेमुळे लोकसभागातून स्वच्छतागृह उभारण्याची वेळ येणार : ॲड दिपक लाड

प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : कुंडलचा स्वातंत्र्य भूमी म्हणून नावलौकिक आहे, पण गावातील प्रमुख भागात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह शोधूनही सापडत नाहीत, यामुळे महिलांची कुचंबना होत आहे.

गावातील प्रमुख गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने गावातील महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागतेच.
तसेच कुंडलच्या रविवारच्या आठवडी बाजारामध्ये येणाऱ्या महिलांसाठी मोठी अडचण निर्माण होते.

महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने महिलांना उघड्यावर जाण्याची नामुष्की येते, यामुळे अनेक ठिकाणी मोठी दुर्गंधी निर्माण होते.

कुंडल गावामध्ये महिलांची लोकसंख्या दहा हजाराच्या वर आहे, बाहेरगावावरून येणाऱ्या नातेवाईक महीला, प्रवासी महिला व कुंडल सारख्या एवढ्या मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये महिलांसाठी एखादेच सार्वजनिक स्वच्छतागृह असावे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब आहे..

राजकीय प्रतिष्ठेसाठी कुंडल मध्ये दोन्ही गट निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा पणाला लावतात.

महिलांच्या स्वच्छता
गृहांसाठी, व सार्वजनिक सोयी सुविधा बाबत दोन्ही गट प्रतिष्ठा पणाला का लावत नाही असा संतप्त सवाल रणसंग्राम सोशल फाउंडेशन कडून करण्यात आला.

महिला अथवा पुरुष दोघांनाही ठराविक काळानंतर स्वच्छतागृहात जाणे आवश्यक असते ही मानवी गरज आहे
मात्र कुंडल येथे महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छता गृहे शोधूनही सापडत नाहीत.
ही वस्तुस्थिती आहे.

71 % महिलांनी घराबाहेर स्वच्छतागृहाचा वापरच करीत नसल्याचे सांगितले, महिला वर्ग शौचाला जाण्याचा त्रास नको म्हणून पाणी पिण्याचे टाळतात,

पाणी पिण्याचे टाळणे आरोग्याला घातक आहे, यामुळे कामानिमित्त अधिक काळ घराबाहेर राहणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत..

तीन ते चार तासात लघवी केली पाहिजे,.. जास्त काळ थांबवून ठेवल्याने इन्फेक्शन, पोटात दुखणे पिशवीची ताकद कमी होणे असे आरोग्यावर परिणाम होतात… दाब जास्त झाल्यास त्याचा किडनीवरही परिणाम होतो.. स्वच्छ ठिकाणीच लघवी केली पाहिजे, अन्यथा साथीच्या आजारांना निमंत्रण मिळते.. स्वच्छतागृहातील पाणी स्वच्छ असावे..

सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने महिलांच्या आरोग्यावरती परिणाम होत आहेत, कुंडल ग्रामपंचायत तिने महिला स्वच्छता गृहांची प्रत्येक वार्डामध्ये उभारणी तात्काळ करावी, अन्यथा कराड-तासगाव रोडवरील पलूस कॉलनी येथील प्रलंबित अंगणवाडी लोकसभागातून उभी केली होती, याच धर्तीवर कुंडल येथे महिलांसाठी लोकसभामधुन स्वच्छता गृहांची उभारणी करून, आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगत महिलांच्या समस्या वरती रणसंग्राम सोशल फाउंडेशन आक्रमक भूमिका घेणार असल्याचे ॲड दिपक लाड यांनी कळविले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.