प्रतिष्ठा न्यूज

मारतळा- विवेकवर्धिनी मध्ये 23 जानेवारी पासुन “ज्ञानेश्वरी उत्सव 2023” महोत्सव-अनेक मान्यवरांनी उपस्थिती-यातुन मिळणार विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
उमरा : मारतळा येथील विवेकवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दि 23 व 24 जानेवारी 2023 रोजी “ज्ञानेश्वरी उत्सव 2023” मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व हिन्दुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त व कै. गुणाजीराव पाटील ढेपे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन  ज्ञानेश्वरी प्रायमरी, सेकेंडरी ईंग्लिश स्कूलच्या प्रांगणात करण्यात आले आहे. तर 25 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता “ज्ञानेश्वरी उत्सव 2023” हा वार्षिक स्नेहसमेलनाच्या कार्यक्रमामध्ये शाळेचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. 23 व 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता सुरूवात होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व व समुहनृत्य स्पर्धेमध्ये  शाळांनी सहभाग घ्यावा असे अवाहान संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य संजय पाटील ढेपे यांनी केले आहे.
“ज्ञानेश्वरी उत्सव 2023” निमित्त आयोजित सदरील तिन दिवशीय शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्याद्वारे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना विवेकवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम 2020 पासून संस्था करीत आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून शाळा व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात. या वर्षी पण छञपती शिवाजी महाराज व हिन्दुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त व कै. गुणाजीराव पाटील ढेपे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.23 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 5 च्या दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटक- शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील, तर अध्यक्ष म्हणुन मुक्तेश्वरभाऊ धोंडगे हे अध्यक्ष आहेत. व प्रमुख पाहूणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे व माधवराव पावडे हे रहाणार आहेत.
तर 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता. सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय समुहनृत्य स्पर्धेचे उदघाटक आ. श्यामसुंदर शिंदे हे आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे हे आहेत. तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख व्यंकोबा येडे व डॉ. सावरगावकर हे प्रमुख पाहुणे आहेत. तर सदरील दोन्ही स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ याच दिवशी सायं 6 वाजता सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली होणार असून या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माध्यामिक चे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून दै.सामना चे जिल्हा प्रतिनिधी विजय जोशी, दादाराव सिरसाट हे रहाणार आहेत.
तर 25 जानेवारी रोजी शेवटच्या दिवशी सायंकाळी 7 वाजता हा शाळेतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून लोह्याचे गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे हे असणार आहेत. तर मुक्तेश्वरभाऊ धोंडगे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, कंधार तालुका कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, शिवसेना माजी तालूकाप्रमुख संजय ढाले, शिविअ श्रीकृष्ण फटाले, केंद्रप्रमुख टी.पी.पाटील, भास्कर पाटील जोमेगावकर, उपसरपंच भास्करराव ढगे, माजी सरपंच माधव ढेपे इत्यादी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.,
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.