प्रतिष्ठा न्यूज

साहित्यिक मन्सूर बाबासाहेब जमादार यांना प्रतिष्ठा फौंडेशनचा प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : साहित्यिक मन्सूर बाबासाहेब जमादार यांना प्रतिष्ठा फौंडेशनचा प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मुळ गांव भिलवडी असले तरीही साहित्यिक जडणघडण कडेगाव मध्येच घडली आहे भिलवडी येथील सेकंडरी हायस्कूलमध्येच साहित्याची गोडी शिक्षकांनी लावली होती ऋषितुल्य ज्येष्ठ साहित्यिक कवी सुधांशू दादा औदुंबर येथे साहित्य संमेलन भरवत असे. सदानंद साहीत्य मंडळाच्या वतीने होणाऱ्या साहित्य संमेलनाला लहान वयात हायस्कूलमध्ये शिकत असताना हजेरी लावत असो मोठमोठ्या साहित्यकांचे विचार बालवयात ऐकायला मिळाले. तेथील कवी संमेलनात कविता मन लावून ऐकत असे तेव्हा वाटायचं आपणही काहीतरी लिहूया. त्यावेळी मनामध्ये लिहिण्याचे बीज रुजू लागले व कॉलेजमध्ये शिकत असताना मराठी विभागाच्या वांॾमय मंडळामध्ये मी माझी पहिली कविता महाविद्यालयाच्या भिंती पत्रकात प्रसिद्ध झाली. यातून लिहिण्याची गोडी वाढली. अन् कविता व कथा लिहू लागलो त्याला अनेक दिवाळी अंकातून कविता प्रसिद्ध ही झाल्या आहेत यामुळेच साहित्यिक कार्यक्रमाला जावू लागलो अंधकवी चंद्रकांत देशमुखे, कथाकार आनंदराव पाटील ,विश्वनाथ गायकवाड, रधुराज मेटकरी,अँड सुभाष पाटील, सु धों मोहिते ,सदिनंद माळी या साहित्यिकाच्या प्रेरणेमुळेच लेखन करत गेलो कवितासंग्रह, कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहेत कडेगाव खानापूर मित्र मंडळ, पुणे. यांचा ज्येष्ठ साहित्यिक व आदर्श शिक्षक पुरस्कार , हर्षद साहित्य मंडळ, पुणे. शाखा- विटा काव्य वाचन पुरस्कार, पश्चिम महाराष्ट्र साहित्य परिषद पलूस काव्य वाचन पुरस्कार , आदर्श शिक्षक पुरस्कार तालुका खानापूर , आपली शिदोरी आपले संमेलन अभयारण्य देवराष्ट्रे, कवी संमेलन शहाबाई यादव साहित्य संमेलन रेणावी कवी संमेलन विविध विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अध्यक्ष व कवी संमेलन अध्यक्षपद भूषविले आहे कडेगाव, विटा येथील विविध स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले आहे कडेगाव , खानापूर साहित्य प्रेमीनी हा पुरस्कार मिळाल्याबदल हार्दिक अभिनंदन केले आहे.
हा पुरस्कार सोहळा रविवारी दि.२२जानेवारी रोजी तासगांव येथील ७व्या प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष भारत पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.