प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत वॉर्ड क्रमांक 9 मध्ये मोकाट १६ डुकरे पकडली : नागरिकांनी केले समाधान व्यक्त

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वार्ड क्रमांक 9 मध्ये आहील्यादेवी सोसायटी परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाने डुक्कर पकड मोहीम राबविली. या कारवाईत बर्वे मामा यांच्या घराजवळ लहान व मोठी 16 डुकरे पकडण्यात आली.

प्रभाग 9 मध्ये मोकाट डुकरांचा उपद्रव होत असल्याने स्थानिक नागरिकांनी या डुकरांना पकडावे याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा केला होता.
त्यामुळे मनपा आयुक्त सुनील पवार यानी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे , स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले , मुकादम आप्पा शिकलगार, मुकादम सागर मद्रासी, राहुल जाधव यांनी संयुक्त कारवाई करत या परिसरात मोकाट फिरणाऱ्या डूकरावर कारवाई केली. या कारवाईबाबत सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे यांनी आरोग्य विभागाचे आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.