प्रतिष्ठा न्यूज

11 ऑक्टोबला इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन कोल्हापूर येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती निमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर – राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्र-स्थापनेचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 11 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, लकी बझारच्या वर, राजारामपुरी येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षी 26 सप्टेंबर 2022 या दिवशी अर्थात घटस्थापनेच्या दिनी हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला 20 वर्षे पूर्ण झाली. या दिद्वदशक-पूर्ती निमित्त संपूर्ण 31 ऑगस्टपासून देशभरात समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबविले जात असून नोव्हेबर महिन्यापर्यंत हे अभियान असेल. इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेला हिंदू संघटन मेळावा हा या अभियानाचा भाग असून कोल्हापूर जिल्ह्यातसह संपूर्ण देशभर या अभियानाच्या अंतर्गत विविध ठिकाणी ‘हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेणे, व्याख्याने, फलकप्रसिद्धी करणे, मंदिरांची आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, महिला संघटनाचे उपक्रम, हिंदु राष्ट्र परिसंवाद’ आदी उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतून हिंदु समाजमनात हिंदु राष्ट्राचा संकल्प दृढ करण्याचा प्रयत्न असणार आहे.

संघटना, संप्रदाय, मंडळे आदी सर्व बिरुदावले बाजूला सारून हिंदू ऐक्यासाठी तसेच हिंदु राष्ट्रासाठी कृतीशील होण्यासाठी या हिंदू संघटन मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या विषयी अधिक माहितीसाठी ९४२०७२२६३२ या क्रमांकावर संपर्क करा, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.