प्रतिष्ठा न्यूज

दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप” जीवनात यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्तेपेक्षाही कठीण परिश्रम आणि सातत्य आवश्यक –डॉ. आशिष अग्रवाल

प्रतिष्ठा न्युज राजू पवार
नांदेड : विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि अभ्यासात सातत्य महत्त्वाचे आहे केवळ विद्यार्थ्याकडे बुद्धिमत्ता असून चालणार नाही तर त्यासाठी अभ्यासाचे वर्षभराचे नियोजन करावे लागेल असे प्रतिपादन येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर आशिष अग्रवाल यांनी व्यक्त केले .
ते राजर्षी शाहू विद्यालय नांदेड येथील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते .ते पुढे म्हणाले की सध्याचा काळ स्पर्धेचा काळ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभराच्या अभ्यासक्रमाचे नियोजन करून अभ्यासामध्ये सातत्य ठेवले पाहिजे तरच त्या विद्यार्थ्यांना यश नक्की मिळू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री बी. एम. हंगरगे हे होते.
तसेच व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर पांडुरंग यमलवाड प्रा. आर. डी. देशमुख, पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आशिष अग्रवाल,प्राचार्य हंगरगे आणि उपस्थित मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अनेक विद्यार्थी यावेळी आपले विचार मांडले आपल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांना आठवणीने गहिवरून आले होते त्यांनी आम्ही आमच्या गुरुजींना कदापिही विसरू शकत नाही.आम्हाला ही शाळा सोडून जातांना दु:ख वाटते.पण भविष्याची लढाई लढावीच लागेल.आम्हाला पुढे शिक्षण घेण्यासाठी जावे लागेल अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. त्यांनी आम्हाला आमच्या आई-वडिलांसारखे मौलिक मार्गदर्शन केले असे विचार यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या यावेळी अध्यक्ष समारोप करताना शाळेचे प्राचार्य श्री बी. एम .हंगरगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना तणावमुक्त आनंदी वातावरणात परीक्षा द्यावी कारण विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये जो अभ्यासक्रम शिकवलेला आहे त्याचे मूल्यमापन होत असते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून परीक्षा दिली पाहिजे. त्यांना नक्कीच यश मिळेल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला. ते बोलतांना पुढे म्हणाले की, आजचा काळ हा स्पर्धेचा काळ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये टिकले पाहिजे. परीक्षेच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी कॉपी मुक्त व तणाव मुक्त वातावरणात परीक्षा दिली पाहिजे. अन्यथा आपले शैक्षणिक नुकसान होऊ शकते. अशा सूचना त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तणावमुक्त आनंदी वातावरणात परीक्षा दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच यावेळी बोलताना डॉ.पांडुरंग यमलवाड म्हणाले की , विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल विचार व्यक्त केले ते खरंच गुरुजींचे यश म्हणावे लागेल कारण विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते हे आई वडिलांसारखे असते त्यामुळे आम्ही पण विद्यार्थ्यांना कदापिही विसरू शकत नाहीत. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगून परीक्षेला निर्भीडपणे सामोरे जावे आणि परीक्षा द्यावी. संस्काराची शिदोरी सोबत आहे भविष्यात वाटचाल करताना यश नक्की मिळणार असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी प्रा.आर.डी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एल टापरे, प्रमुख क्रीडा विभाग प्रमुख रामनबैनवाड, श्री आनंद मोरे ,श्री एन पी केंद्रे, डॉ. माणिक गाडेकर ,श्री राजेश कदम ,श्री रत्नाकर कोत्तापल्ले ,श्री विठ्ठल पोकलेवाड, श्री बालाजी कदम व सर्व इयत्ता 9वी चे विद्यार्थी व वर्गशिक्षक यांच परिश्रम लाभले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , आभार इयत्ता 9 वी वर्गातील कु. प्राप्ती आळंदकर आणि कुमारी श्रेया इंगळे यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.