प्रतिष्ठा न्यूज

प्रशासनाने सामोपचाराने मार्ग काढावा अन्यथा… तासगाव मोर्चातील सर्वपक्षीयांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : प्रशासनाने सामोपचाराने मार्ग काढावा,जर तुम्ही काम बंद आंदोलनावर ठाम राहिलात, तर आम्ही गावे बंद ठेवू,या आंदोलनाची ठिणगी राज्यभर पसरेल त्यातून होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा खणखणीत इशारा तासगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तासगाव तहसील वर काढलेल्या विराट मोर्चातुन प्रशासनास दिला आहे.तसेच इथून पुढच्या काळात प्रशासनाने आपला कारभार सुधारणा नाही तर भ्रष्ट अधिकाऱ्यां विरोधात हंटर फोड आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी सर्वच नेत्यांनी दिला आहे.
तासगावच्या भूमी अभिलेख कार्यालयातील बेधुंद कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप माने, सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले, शेतकरी सुनील घेवारे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या विरोधात तालुक्यातील सर्वपक्षीयांनी तासगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.यावेळी बोलताना सर्वच प्रमुख नेत्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले,तसेच अधिकारी चंद्रकांत शिरढोणे यांच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली.गेली कित्येक वर्षे प्रदीप माने हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून सर्व सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तें नेहमी तत्पर असतात,तालुक्यातील काळे धंदे बंद व्हावेत यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता, तालुक्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयात गोरगरिबांची कामे घेऊन जाऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात,असे असताना प्रदीप माने यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून तो खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी मोर्चातील सर्वच आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी तहसीलदार रवींद्र रांजणे यांना निवेदन देण्यात आले.प्रशासनाने याबाबत लवकरच सामोपचाराने मार्ग काढावा, जर प्रशासनाने काम बंद ठेवले तर आम्ही गावे बंद करूआणि या प्रकरणी मुख्यमंत्री गृहमंत्री लोकायुक्तांची भेट घेऊ अशी भूमिका मांडली आहे. यावेळी सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष जयंत पाटील, डॉक्टर विवेक गुरव,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे,शिवसेना जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील, काँग्रेसचे राजीव मोरे, शंभुराजे काटकर, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजीव पाटील,विशाल सिंह रजपूत,नितीन पाटील यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. यावेळी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष विकास डावरे, विशाल शिंदे, दत्तात्रय चवदार,खंडू पवार, निशिकांत पाटील,चंदन चव्हाण शिवाजी गुळवे,अमोल कदम, अजिंक्य पाटील,यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,
विविध गावचे सरपंच,सामान्य नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.