प्रतिष्ठा न्यूज

रोहिपिंपळगाव येथील सहा वर्षीय मुलीच्या खुनातील आरोपी जेरबंद- तपासातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : पोलीस स्टेशन मुदखेड हद्दीतील दि. 14 जानेवारी 2024 रोजी एका 06 वर्ष वयाचे मुलीचे अपहरण झाल्याची माहिती मिळाले वरुन पो. स्टे. मुदखेड गुरनं 02/2024 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील अपन्हत मुलीचा मुदखेड परिसरात शोध घेतला असता, दि. 15 जानेवारी 2024 रोजी मुदखेड ते उमरी जाणारे रोडचे बाजुला उन्हाळे यांचे मोकळया जागेत अपन्हत मुलीचे प्रेत मिळुन आले. मिळुन आलेल्या मुलीच्या प्रेताचा पंचनामा करुन सरकारी दवाखाना नांदेड येथे पोस्टमार्टम करण्यात आले.
त्यामध्ये वैद्यकीय अभिप्राया नंतर सदर गुन्ह्यात कलम 302, 366 (अ), 376 (अ ब) 201 भा. दं. वि. सह कलम 6 बालकाचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण कायदा प्रमाणे कलमे वाढ करण्यात आली आहेत.
नमुद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड व मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी घटनास्थळी भेट देवुन त्यांचे आदेशाने मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुशीलकुमार नायक, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड व पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा कॅम्प मौजे रोहीपिंपळगाव ता. मुदखेड या गावात करण्यात आला होता.
पोलीसांचे वेगवेगळे 06 तपास पथके तयार करुन पथकाकडुन गावातील लोकांना विचारपुस केली. तसेच गोपनिय बातमीदार नेमण्यात आले, गुन्ह्यात भौतीक, तांत्रीक पुरावे हस्तगत करुन अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलीसांना मिळालेल्या गोपनिय बातमी वरुन आरोपी दशरथ ऊर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ, वय-23 वर्ष, व्यवसाय मजुरी/सुतारकी रा. रोहिपिंपळगाव ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्यात घेवुन गुन्हया संबंधाने विचारपुस केली असता, त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आरोपीस सदर गुन्हयाचे अधिक तपासा संबंधाने पोलीस कोठडी मिळणे कामी मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 31जानेवारी 2024 रोजी पावेतो पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्हयात इतर आरोपीचा सहभाग आहे काय? याचा तपास चालु असुन, सदर गुन्हयाचा तपास श्री सुशिलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा हे करीत आहेत.
नमुद गुन्हयाचा तपास मा. श्री शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, श्री खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सुशीलकुमार नायक, पोनि श्री उदय खंडेराय, वसंत सप्रे, सपोनि श्री चंद्रकांत पवार, पांडुरंग माने, कमल शिंदे, बाबासाहेब कांबळे, पोउपनि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, अशिष बोराटे, दशरथ आडे, गजानन दळवी स्थानिक गुन्हे शाखेचे अमंलदार, मुदखेड पोलीस स्टेशनचे अमंलदार तसेच पो. स्टे. नांदेड ग्रामीण, इतवारा पो.स्टे. लिंबगाव व सायबर सेल येथील अमंलदार यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.