प्रतिष्ठा न्यूज

व्यायाम हेच सर्व रोगांवर औषध : डॉ . बाळासाहेब चोपडे

प्रतिष्ठा न्यूज / पंकज गाडे
भिलवडी : भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये सांगली जिल्हा विभागीय क्रीडा परिषदेची अंतिम सभा डॉ. बाळासाहेब चोपडे उपाध्यक्ष , भिलवडी शिक्षण संस्था , भिलवडी यांच्या उपस्थितीत व मा. डॉ.पी.टी . गायकवाड क्रीडा अधिविभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि सांगली झोनलचे प्रमुख प्राचार्य , डॉ. दीपक देशपांडे , डॉ. आर.एस. साळुंखे , प्राचार्य कला , वाणिज्य , व विज्ञान महाविद्यालय पलूस ‘ मा. मोहन पाटील , उपाध्यक्ष सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटना , मा. जे .बी . चौगुले संचालक , मा. मानसिंग हाके सचिव , भिलवडी शिक्षण संस्था , डॉ. महेश पाटील शारीरिक प्रशिक्षक – बाबासाहेब चितळे महाविदयालय भिलवडी, . डॉ. एस.डी. कदम सर यांच्या उपस्थित संपन्न झाली .
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. बाळासाहेब चोपडे म्हणाले की , रोग कोणताही असो तो होऊ नये म्हणून खेळ , विविध क्रीडा आणि योग साधना यांचा अंगीकार वेळीच केला तर असाध्य गोष्टी साध्य करता येतात . खेळाने मन, मनगट , व मेंदू बळकट होण्यास मदन होते .ज्यांचे आरोग्य चांगले त्यांचे मन निर्मळ असते व ज्याचे मन निर्मळ त्याचे आरोग्य चांगले राहाते . निर्मळ मनाची माणसं अधिक काळ जगतात . अशा लोकांना रोगांचा प्रादुर्भाव फारच कमी होतो म्हणून चांगले आरोग्य ही दीर्घकालीन जीवनाची वाटचाल आहे असे ते म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. पी.टी. गायकवाड सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, खेळ हा मनास शांतता निर्माण करून देवून दीर्घकाळ मनाला आनंद निर्माण करून देणारा प्रकार आहे म्हणून सर्वांनी विविध खेळ खेळलेच पाहिजेत असे ते म्हणाले .
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांगली विभागीय झोनल प्रमुख प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले , मा. आर . आर. पाटील महाविद्यालय सावळजचे क्रीडा प्रशिक्षक प्रा . पी.बी. चव्हाण यांचा सेवानिवृती निमित्त सत्कार करणेत आला . शिवाजी विद्यापीठ
परीक्षेत्रातील शारीरिक शिक्षण संचालकांनी पीएच .डी. ही पदवी प्राप्त केल्याबदल प्रा . डॉ. सतीश माने , प्रा.डॉ. . आकाश बनसोडे , प्रा.डॉ. रुपाली कांबळे . प्रा.डॉ. लीना पाटील यांचा सांगली जिल्हा विभागीय क्रीडा परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करणेत आला . सांगली विभागीय क्रीडा स्पर्धा विविध महाविद्यालयानी आयोजित केल्या त्या सर्व स्पर्धा प्रमुखांचा सत्कार करणेत आला यावेळी विविध महाविद्यालयातून आलेल्या काही क्रीडा प्रशिक्षकांनी मनोगत व्यक्त केली . त्यामध्ये प्रामुखाने डॉ. महेश पाटील , प्रा.डॉ.संदीप पाटील , प्रा. एन.डी. बनसोडे ‘ प्रा. अजय मराठे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही एम. गाडे व प्रा. ए एन. केंगार यांनी केले . तर आभार डॉ. डी.पी. खराडे यांनी मानले .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.