प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगडच्या वेदिका बडवे ची “न्यू हेवन विद्यापीठात मास्टर्स इन इन्फाॅर्मेशन सायन्स” निवड : मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधुन शिक्षण घेऊन वार्षिक १.५० कोटीचे पॅकेज

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : अभियांत्रिकीच्या शिक्षणात अल्पावधीतच शैक्षणिक गुणवत्ता व नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत प्लेसमेंट देऊन कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेली पंढरपूर येथील कुमारी वेदिका संतोष बडवे हिची अमेरिकेतील न्यू हेवन विद्यापीठात “मास्टर्स इन इन्फाॅर्मेशन सायन्स” प्रोग्रामसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केल्यानंतर वेदिका संतोष बडवे हिने न्यू हेवन विद्यापीठात मास्टर्स इन इन्फाॅर्मेशन सायन्स प्रोग्रामसाठी प्रवेश घेतला असून या शिक्षणासाठी वेदिका बडवे हिला विद्यापीठाकडून डीन शिष्यवृत्ती मिळाली आहे.
न्यू हेवन विद्यापीठातून “मास्टर्स इन इन्फाॅर्मेशन सायन्स” चे दोन वर्षांचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर कुमारी वेदाका संतोष बडवे हिला नासा, मायक्रोसॉफ्ट, गुगल, एँपल अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये १. ५० करोड रुपयाचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये अभियांञिकीची पदवी घेऊन अमेरिकेतील न्यू हेवन विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी जात असलेल्या कुमारी वेदिका बडवे हिचे आई स्नेहा संतोष बडवे, महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.