प्रतिष्ठा न्यूज

कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा प्रवर्गातील उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 27, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या गुगल लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रेाजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये सारथीच्या लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी) या उमेदवारांना जिल्ह्यातील स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमांचे ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांमार्फत कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्यासाठी नोंदणी फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्याची लिंक https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi ही आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.