प्रतिष्ठा न्यूज

“गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्यगीताचे गायन आता 1 मे 2023 ऐवजी 15 ऑगस्ट 2023 रोजी होणार : जिल्हा प्रशासन नांदेड

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन” अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित जिल्हा प्रशासन च्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्हयातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यामिक शाळामधील सर्व विद्यार्थी आपआपल्यां शाळेत कार्यालयात एकाच वेळी सकाळी 8:00 वाजता लोकप्रतिनिधीसह दि.1 मे 2023 रोजी “गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्यगीताचे सामुदायिक गायन करण्यात येणार होते परंतु सध्या राज्यातील हवामानामध्ये बदल होवुन उष्ण्तेची तीव्र लाट निर्माण झाली या अनुषंगाने शासनाने दि. 21एप्रिल 2023 पासुन शालेय विद्यार्थ्यांना सुट्या देण्याचा निर्णय घेतला आहे. उष्णतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणुन सुरक्षेच्या दृष्टीने सद्यस्थितीत शाळेत विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत. म्हणून जिल्हा प्रशासनाने दि.1 मे महाराष्ट्र दिनी होणारा सामुदायिक “राज्यगीत गायन” हा उपक्रम तुर्तास स्थगित केला आहे. सदरील गीत गायन हा उपक्रम आता दि.15 ऑगस्ट 2023 रोजी “स्वातंत्र्य दिनी” राबविण्या चे धोरण योजिले आहे.
तसेच या उपक्रम कार्यक्रमाचे पुढील नियोजन सर्वांना कळविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
तेंव्हा दि.1 मे 2023 रोजीच्या राज्यगीत गायन उपक्रम तुर्तास स्थगीत करण्यात आला असल्याची नोंद सर्व संबंधीत प्राचार्य, मुख्यााध्याक, शिक्षक यांनी घ्यावी. असे मा.जिल्हाधिकारी, मा.मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक नांदेड यांनी आवाहन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.