प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यात ‘धुवाधार’,तीन प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ घरांची पडझड

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात गेले काही दिवस धुवाधार पाऊस पडत आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तालुक्यात १२२ मि.मी. पाऊस झाला असून एकूण२१२३ मि. मी. पाऊस झाला आहे.कुंभी धरण ६७ टक्के भरले आहे. कोदे, वेसरफ,अंदुर प्रकल्प यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
तालुक्यातील सांगशी,पळसंबे, मांडूकली,वेतवडे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. भुईबावडा घाटात दरड कोसळली तर कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर साळवण व अन्य काही ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडून वाहतूक व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली होती. बोरबेट येथे विजेचा खांब कोसळून वीज प्रवाह खंडित झाल्याने त्या भागातील गावे तीन दिवस अंधारात होती.
खोकुर्ले येथील यशवंत भागोजी कांबळे यांच्या राहत्या घराची मागील भिंत कोसळून व अन्य तीन घरांची पडझड होऊन अंदाजे ५६ हजाराचे नुकसान झाले आहे.

” तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गगनगड, पळसंबे रामलिंग लेणी, लखमापूर, अंदुर,कोदे, वेसरफ डॅम व तेथील सांडव्याच्या परिसरात जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे.
– डॉ. शैलजा पाटील, तहसीलदार गगनबावडा

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.