प्रतिष्ठा न्यूज

मनुस्मृतीतील अमानवी श्लोकांचा शालेय अभ्यासात समावेश करा :मराठा सेवा संघाची शिक्षण मंत्र्यांकडे आक्रमक मागणी

प्रतिष्ठा न्यूज
पुणे / प्रतिनिधी : मनुस्मृतीतील सर्व श्लोक व सर्वच सनातन धर्म साहित्य भारतीय विद्या या नावाने  अभ्यासक्रमात आहे. तर बहुजनांमध्ये समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, समानता आणि मानवता हे सदगुण उपजत कोरलेले आहेत त्यामुळे या दोन्हीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश न करता मनुस्मृतीतील  अमानवी, व्देशाची भावना अनावर करणारे समाविष्ट करावे म्हणजे मनुस्मृतीच्या विरोधात बहुजन समाज का आहे? हे मुलांना शालेय स्तरावरच कळेल आणि त्यांना आपल्या गुलामीची कारणे समजून ते सांस्कृतिक धार्मिक क्रांती घडवून आणू शकतील अशी सुचना करणारे निवेदन मराठा सेवा संघाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पाठवले आहे.
याबाबत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मंत्री केसरकर यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागात इंटरनेट आणि विजेची समस्या लक्षात घेऊन तसेच अहवालाची 330 पाने वाचण्यास लागणारा विलंब, उन्हामुळे लोक एकत्र येऊन चर्चा करण्यास अडचण लक्षात घेऊन तीन जून ऐवजी 10 ऑगस्ट पर्यंत आक्षेप घेण्यास मुदत वाढ देण्यात यावी.  अभ्यासक्रमात  मनुस्मृती मधील श्लोक व सर्वच सनातन धर्म साहित्य उच्च शिक्षणात पदवी, पदव्युत्तर पातळीवर भारतीय विद्या या नावाने अभ्यासक्रमात आहे. तसेच बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, मानवता, समानता, पोषणवाद इत्यादी मूल्ये शिकवण्याची गरज नाही . कारण ते सर्व सद्गुण बहुजनांच्या हृदयात उपजतच कोरलेले व पेरलेले असतात.  शालेय शिक्षणात मनुस्मृती मधील सर्वात वाईट व सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक आर्थिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात द्वेषाची भावना अनावर करणारे , चातुर्वर्ण्य व्यवस्था विश्लेषण व ब्राह्मण सर्वोच्च , अन्य पुरुष व महिला शुद्र व ताडनके अधिकारी इत्यादी कायदे बालपणीच्या शिक्षणात अगत्याने समाविष्ट केले जावेत. असे काही निवडक संस्कृत श्लोक व त्यांचा अत्यंत सरळ सोप्या मराठी लोकभाषेत अर्थ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा. यामुळे बालकांना मनुस्मृतीच्या विरोधात बहुजन समाज का आहे ? ते समजेल. हे अमानवी श्लोक समाविष्ट करावेत. जेणेकरून बहुजन बालकांना व युवकांना आपल्या गुलामीची कारणे समजतील. ते पेटून उठतील व नवीन सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्रांती घडवून आणतील. यासोबतच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन का केले होते? याबाबत सत्य कथन असावे. भारतीय संविधान व मनुस्मृती बद्दलचे तुलनात्मक दृष्टीने अत्यंत स्पष्ट विश्लेषण समाविष्ट करण्यात यावे. इतिहास शिकवताना काही शिक्षक छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट शिकवताना ज्याप्रमाणे मुलांच्या मनात मुसलमान द्वेष निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्याचप्रमाणे मनुस्मृती मधील असे श्लोक शिकवताना बहुजन विद्यार्थी ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्थापन भस्मसात करण्यासाठी तयार झाले पाहिजे. कारण शिक्षणाचे उद्दिष्ट तेच आहे. आम्हाला कल्पना आहे की, मनुस्मृतीच नव्हे तर कोणताही ग्रंथ सरसकटपणे त्याज्य नसतो. त्यात थोडासा का होईना भाग विषारी व त्याज्य असू शकतो. अशा वेळी मध्यममार्ग काढून चांगले घ्यावे, ही आपली भूमिका चांगली आहे . परंतू अगदीं पंचामृत असलेल्या एखाद्या चविष्ट रुचकर जेवणात जर फक्त अर्धा चमचा अत्यंत जहरी सायनाईड विष टाकून ते जेवण घेतले तर जेवणारांचा मृत्यू अटळ आहे. म्हणून कृपया सर्वप्रथम सर्वच बालकांना जहरी विषाची ओळख करून देणे योग्य राहील असे मत आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणायचे की, ” काही सनातनी ब्राह्मण सांगतात की सनातन धर्मात (मनुस्मृतीमध्ये ) काही बाबी चांगल्या आहेत. त्यांचा हा प्रतिवाद म्हणजे  संडासच्या टाकीत पडलेला एखादा शेंगदाणा शोधण्याचा प्रयत्न आहे. ज्यांना अशा टाकीत पोहायचे असेल त्यांनी तसे करावे . ” ( संदर्भ — देवळांचा धर्म व धर्माची देवळे ) अलीकडच्या काळात मूळ मनुस्मृती मधील बरेचसे श्लोक पुनर्लेखन केले आहेत . मूळ बापटांनी केलेला मराठी अनुवादही बदलला आहे. शालेय जीवनातील प्रत्येक विषयात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असे साहित्य समाविष्ट करावे. गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा. असेही खेडेकर यांनी पत्रात म्हटले आहे.
………………..

पुरुषोत्तम खेडेकर चिखली .
संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ .
मोबाईल –+९१९८२३६९३२२७ .
ईमेल — pkhedekar.mss@gmail.com

सदर पत्राच्या प्रती

शिवश्री राहूल रेखावार , संचालक एससीईआरटी पुणे . शिवश्री अनिल भोसले , खाजगी सचिव , शालेय शिक्षण मंत्री शिवश्री दिपक केसरकर

यांना पाठविण्यात आल्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.