प्रतिष्ठा न्यूज

कवी समजून घेताना कार्यक्रम रविवारी ३० जुलै रोजी नगरवाचनालय सांगली

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : साहित्याक्षर प्रकाशन ,आम्ही सिद्ध लेखिका सांगली व नगरवाचनालय सांगली आयोजित कवी समजून घेताना हा कार्यक्रम रविवारी ३० जुलै रोजी नगरवाचनालय सांगली येथे संपन्न होत आहे.
‘कवी नव्हे कविता मोठी झाली पाहिजे’ या उपक्रमांतर्गत ‘कवी समजून घेताना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना’ या कवितासंग्रहावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे ,प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी आहेत.तसेच कवी दयासागर बन्ने व डाॕ. संजय बोरुडे कवितासंग्रहावर भाष्य करणार आहेत.इचलकरंजी येथील कवी संभाजी माने यांच्या ‘आशेची पहाट’ आणि नांदेड येथील कवयित्री छाया बेले यांच्या ‘हॕपी होमच्या भिंतीआड’ या कवितासंग्रहांचे प्रकाशन होणार आहे. यानंतर अहमदनगर येथील सुप्रसिद्ध कवयित्री रचना यांच्या कवितांचा कार्यक्रम ‘कवी समजून घेताना ‘ या सत्रांतर्गत होईल . रसिकांशी संवाद होईल.त्यानंतर ऋतुरंग कविसंमेलन संपन्न होणार आहे.या कविसंमेलनाच्या अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार मनीषा रायजादे-पाटील आहेत.सूत्रनिवेदक जस्मिन शेख व वैष्णवी जाधव आहेत.महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक मान्यवर साहित्यिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.तरी जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन नियोजकांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.