प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा येथील डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयास द्वितीय क्रमांकासह जनरल चॅम्पियनशिप : आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेसाठी चौघाची निवड

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धा मुरगुड येथे लोक नेते सदाशिवराव मंडलिक साई आखाडा येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयास फ्री स्टाईल प्रकारात १२ गुणांसह द्वितीय क्रमांकासह जनरल चॅम्पियनशिप मिळाली. पहिला क्रमांक वाकरे तर तिसरा क्रमांक गडहिंग्लज महाविद्यालयाला मिळाला.
महाविद्यालयातील पै अमोल बाबुराव बोंगार्डे याने ५७ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक तर पै प्रवीण कृष्णात वडगावकर याने याच गटात रौप्य पटकावले, त्याचबरोबर पै शंकर आप्पा टीकोळे यास ७९ किलो वजनी गटांमध्ये रौप्य पदक व तुषार खाशाबा ठोंबरे याने १२५ किलो वजनी गटामध्ये रजत पदक पटकावले. या सर्वांची कराड या ठिकाणी होणाऱ्या आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी त्यांना संस्था अध्यक्ष व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतीश देसाई सचिव व प्र.प्राचार्य डॉ. विद्या देसाई व प्रशिक्षक, आईवडील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.