प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्रातील भाजपाप्रणित युती सरकारविरोधात सांगली काँग्रेसचे ‘चिखल फेक’ आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. २१ : राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्ट भाजपाप्रणित युती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात सांगली काँग्रेस पक्षाने काँग्रेस भवनासमोर आज सरकारच्या प्रतिमेस चिखल माखून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा जोरदार निषेध केला. महायुती शासनाचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महागाई, बेरोजगारी, नीट परीक्षा घोटाळा, खते व बियाणांचा काळाबाजार
घरगुती वापराच्या वीज बिलातील भरमसाठ वाढ,
शासकीय व शाळा महाविद्यालयांतील पूर्णवेळ शंभर टक्के नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही. कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. नीट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे.

शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी सांगलीत हे चिखलफेको आंदोलन करण्यात येत आहे असे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. विक्रमसिंह सावंत व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. या आंदोलनात प्रा. डॉ. सिकंदर जमादार,माजी नगरसेवक अय्याज व वहिदा नायकवडी,मंगेश चव्हाण, मयूर पाटील, अल्ताफ पेंढारी,इलाही बारुदवाले,तौफिक शिकलगार, विजय आवळे, उत्तम सुर्यवंशी, संगाप्पा पाटोळे, योगेश राणे, तुकाराम माळी जत,बाबासाहेब कोडग,अमित पारेकर, महावीर पाटील, मारुती पवार, मोहन माने पाटील, जे. बी. पाटील, सी. आर. सांगलीकर, आनंदराव पाटील, संतोष भोसले, सदाशिव खाडे, नामदेव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, संभाजी पाटील, अशोकदादा पाटील नागठाणे, बिपीन कदम,रविंद्र वळवडे, प्रा. एन.डी.बिरनाळे, डॉ. प्रताप भोसले, अरुण गवंडी, सुखराजसिंग धिल्लो, सनी धोतरे,प्रशांत देशमुख, अजय देशमुख, आयुब निशाणदार, प्रशांत अहिवळे, अरविंद जैनापुरे, विक्रम कांबळे,
अजित ढोले, पैगंबर शेख, पैलवान प्रकाश जगताप, अरुण पळसुले, विठ्ठलराव काळे, अल्लाबक्ष मुल्ला कवठेमहांकाळ , संजय हजारे, लालू मेस्त्री, आनंदराव पाटील, श्रीधर बारटक्के, नामदेव पठाडे,बाबगोंडा पाटील, सुहेल बलबंड, सुरेश गायकवाड, शैलेंद्र पिराळे, मौला वंटमुरे, रामसिंग परदेशी, अशोकसिंग रजपूत, श्रीमंत पांढरे, सुनील पाटील, विश्वनाथ पाटील, संगाप्पा पाटोळे, सुनिल गुळवणी, संजय पाटील, राजेंद्र कांबळे, विजय पाटील, राम परदेशी, गणेश गतारी, सागर मुळे, पिंटू डुबल, प्रदीप निंबाळकर, योगेश राणे, नासीर चौगुले, इराप्पा नाईक व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

राज्यातील जनतेत या महायुती सरकारबद्दल तीव्र असंतोष धुमसत आहे. त्याची झलक लोकसभेच्या निवडणुकीत दिसली. महायुतीच्या पराभवाचा तो ट्रेलर होता. विधानसभेतील त्यांच्या पराभवाचा पिक्चर अभी बाकी आहे अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.