प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील रिलायन्स दरोड्यातील सत्रधार व कुख्यात दरोडेखोर सुबोधसिंग अटक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : देशभर गाजलेल्या सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकून सुमारे साडे सहा कोटी रूपयांचे दागिने लांबविले होते. या दरोड्यातील मुख्य सुत्रधार सुबोधसिंग ईश्वर प्रसाद सिंग (रा. चिश्तीपुर थाना-चंडी, जि. नालंदा राज्य बिहार) यास विश्रामब पोलिसांनी अटक केली. अशी माहिती पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी. पोलीस अधीक्षक साो, सांगली, मा.अपर पोलीस अधीक्षक, सांगली व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं.४२४/२०२३ भादंविसं कलम ३९५,३९८, १२०(ब),३२३,५०४, ५०६,४२७,१७०,१७१ सह शस्त्र अधिनियम कलम ३,२५ या गुन्हयाचा तपास चालु आहे. सदर गुन्हयामध्ये एकुण ०९ आरोपींनी दि.०४.०६.२०२३ रोजी सांगली शहरातील रिलायन्स ज्वेल्स या दुकानावर अग्निशस्त्रासह दरोडा टाकुन त्या दुकानातुन ६,४४,७२,७८७/- रु किंमतीचे सोने व हिऱ्याचे दागीनेसह रोख रक्कम व मोबाईल चोरून त्यांचे जवळील चार चाकी व दुचाकी वाहनावरुन पळून गेले होते. विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा सांगलीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सदर गुन्हयातील आरोपींना अटक करण्याचे अनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास करीत आहेत.

सदर गुन्हयाचे तपासामध्ये नमुद अटक आरोपी सुबोध सिंग ईश्वरप्रसाद सिंग व त्याची दरोडेखोर टोळी असल्याचे व नमुद अटक आरोपीने सदरचा गुन्हा पटणा येथील बेऊर कारागृहात राहून, तेथुन मोबाईलचा वापर करून त्यामधील इंटरनेट व फेसबुक मॅसेंजरद्वारे व्हिडीओ कॉल व व्हाईस ओव्हर इंटरनेट कॉल करून, त्याचे जेल बाहेरील साथीदारांना गुन्हा करणेबाबत मार्गदर्शन करुन घडवुन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. अटक आरोपी सुबोधसिंग हा व्हिडीओ कॉल द्वारे त्याच्या टोळीतील साथिदाराबरोबर गुन्हा घडणेपूर्वी व प्रत्यक्ष गुन्हा घडते वेळी त्यांचे संपर्कात होता. सदरचा गुन्हा हा अटक आरोपी सुबोध सिंग ईश्वर प्रसाद सिंग यानेच घडवून आणलेला असुन तो सदर गुन्हेगारी कटाचा प्रमुख सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्हयातील अटक आरोपी सुबोध सिंग ईश्वर प्रसाद सिंग, रा. चिश्तीपुर थाना-चंडी, जि. नालंदा राज्य बिहार हा बँका, ज्वेलरी शॉप तसेच सोन्यावर कर्ज देणा-या मुथुट फायनान्स व मणःपुरम गोल्ड यासारख्या सोन्याचे व्यवहार करणा-या वित्तीय संस्थांवर देशभरात दरोडे घालणा-या आतंरराज्य टोळीचा प्रमुख असुन सध्या तो कारागृहात असुनही त्याचे साथीदारांचे मार्फतीने देशभरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे घडवुन आणत असतो. आतापर्यंत त्याचेवर देशभरात दरोडयाचे एकुण ३२ गुन्हे दाखल आहेत. याव्यतीरिक्त त्याचेविरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न, सरकारी नोकरावर हल्ला, दंगल, अवैध शस्त्र बाळगणे, फसवणुक इत्यादी प्रकारचे गुन्हे देखील दाखल आहेत.

सदर गुन्हयामध्ये आरोपीचे नाव निष्पन्न झालेनंतर मा. वरीष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस तपास पथक पटणा, बिहार राज्यात पाठविण्यात आले. तेथील कोर्टामध्ये कायदेशीर प्रक्रीया पार पाडुन सदर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार व कुख्यात दरोडेखोर आरोपी सुबोध सिंग ईश्वर प्रसाद सिंग रा.चिश्तीपुर थाना-चंडी, जि. नालंदा राज्य- बिहार यास आदर्श सेंट्रल जेल, बेऊर पटणा येथुन ताब्यात घेवून सांगलीत आणुन त्यास वरील गुन्ह्यात अटक केली आहे. त्यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास दि. .१२.२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे, विश्रामबाग पोलीस ठाणे हे करीत आहेत.

पोलीस अधीक्षक श्री बसवराज तेली, यांचे मार्गदर्शानाखाली श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली श्री. अण्णासाहेब जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी, सांगली शहर विभाग यांच्यासह श्री. संजय मोरे, पोलीस निरीक्षक, श्री. सतिश शिंदे, पो.नि. स्था.गु.अ. शाखा, सांगली, श्री. कुंभार, सपोनि, श्री. पठाण, पो.उ.नि. विश्रामबाग पोलीस ठाणे, श्री. काझी, पो.उ.नि., जिविशा, सांगली, श्री. कुमार पाटील, पो.उ.नि. स्था.गु.अ. शाखा, सांगली, पोहेकॉ/४३७ गुरव, पोहेकॉ/१८८१ सागर लवटे, स्था.गु.अ.सांगली पोहेकॉ/४०५ शिरगुप्पी, पोहेकों / १४०९ चव्हाण, पोहेकॉ/८३० साळुंखे, पो.ना./ १५३८ पाटील, पोकॉ/१०१७ देशिंगकर, पोकॉ/ २३६६ कानडे, पोकॉ/१४३५ घस्ते विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.