प्रतिष्ठा न्यूज

लोकसभेसाठी विशालदादा पाटील यांनी कॉंग्रेस व अपक्ष भरले दोन अर्ज; सहानूभूतीच्या लाटेवर बंडखोरीचा यल्गार ; उद्या मंगळवारी सांगलीत काढणार पदयात्रा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाविकास आघाडीकडून उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अखेर सहानूभूतीच्या लाटेवर स्वार होत बंडखोरी करण्याचा यल्गार त्यांनी पुकारला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल करण्याचा निर्णय त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला. सोमवारी विशाल पाटील यांनी काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी दि. १६ रोजी सांगली येथील गणपती मंदिर पासून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘यल्गार स्वाभिमानाचा, हुंकार सांगलीचा…!’ असा नारा देत विशाल पाटील यांनी बंडासाठी दंड थोपटले आहेत. तसेच मंगळवारी सकाळी ९.३० वाजता गणपती मंदरासमोर पदयात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीने सांगलीची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडली आहे. मात्र, काँग्रेसने त्यावरील दावा अद्याप सोडलेला नाही. सांगलीतील वस्तुस्थिती तपासून घ्यावी, अशी मागणी आमदार विश्वजीत कदम यांनी पक्षाकडे पुन्हा एकदा केली आहे. १९ एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यात बदलाची अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेस पक्षातर्फेही एक अर्ज दाखल केले आहेत.

महाविकास आघाडीत बदल झालाच नाही, तर पर्याय म्हणून ते अपक्ष उमेदवार असतील यात शंका राहिलेली नाही.
काँग्रेसच्या निर्णयावर बंडखोरीबाबतचा निर्णय अवलंबून असेल. त्याविषयी २२ एप्रिलपूर्वी निर्णय घेतला जाईल, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले होते.

उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील सभेत महाविकास आघाडीतर्फे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला. लढत निकराची व्हायची असेल तर विशाल हेच विरोधी उमेदवार असले पाहिजेत, अशी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची धारणा आहे. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विशाल यांनी निवडणूक लढवावी, यासाठी आग्रही आहेत. उमेदवारी डावलल्यावरून मतदारांमध्ये विशाल पाटील यांच्याविषयी मोठी सहानुभूती आहे. या सहानूभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांनी आज दोन अर्ज दाखल केले आहेत.
याबाबत निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे ती अशी,
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या आज दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

(1) विशाल प्रकाशराव पाटील यांनी इंडियन नॅशनल कॉग्रेस पक्षातर्फे एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.