प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आत्मा योजनेची चौकशी करून तात्काळ अहवाल देण्याचे प्रकल्प संचालकांचे आदेश

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यातील कृषी विभागातील आत्मा योजनेत ९० टक्के शेतकरी गट विना संमतीपत्राचे, खाडाखोड व कागदपत्रे संशयास्पद असल्याचे आढळून आल्याने यासंबंधी मनसे नेते अमोल काळे यांनी जांबुवंत घोडके आत्मा प्रकल्प संचालक सांगली यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.यावर घोडके यांनी तालुका कृषी अधिकारी यांना पत्र व्यवहार करत पंधरा दिवसात अहवाल दया असे आदेश दिले आहेत.दिलेल्या निवेदनात अमोल काळे यांनी सांगितले की आत्माचे शेतकरी गट नोंदणीचे मस्टर,गटात सहभागी सदस्यांची संख्या,गट नोंदणी प्रस्ताव प्राप्तीचा दिनांक,गट प्रमुखाचे नाव व मोबाईल नंबर,गट नोंदणीसाठी प्रस्ताव,कृषि कार्यालयास पाठवल्याचे पत्र कमांकाच दिनांक नाही,तसेच गटाचे प्रमाणपत्र प्रस्ताव मिळाल्याची गट प्रमुख व गट प्रतिनिधी यांच्याही सहया नाहीत,वरील सर्व माहिती माहिती अधिकार द्वारे प्राप्त झालेली आहे.हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून यासाठी कारणीभूत अधिकाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन येईल व त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार राहील. असा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी दिला होता.यावर घोडके यांनी तासगाव तालुका कृषी अधिकारी यांना पत्र व्यवहार करत पंधरा दिवसात अहवाल दया असे आदेश दिले आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.