शांतिनिकेतन विद्यालय आंबुलगा येथील शाळेचा विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक
प्रतिष्ठा न्यूज/ जिल्हा प्रतिनिधी
नांदेड दि.५ : शांतिनिकेतन विद्यालय आंबुलगा ता.मुखेड येथील शाळेतील व्हाॅलिबाॅल संघ 14 वर्षाखालील विद्यार्थ्यांनी विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विभागीय स्पर्धा उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
त्या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक तथा शिक्षक सेना तालुकाध्यक्ष रमन काब्दे सर,चंदावाड सर, बालाजी डोंगळीकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षक सेना नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री संतोष आंबुलगेकर,श्री तानाजी पवार,श्री परशुराम येसलवाड, पत्रकार श्री वसंत शिरसाठ,राजू पाटील पवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.