प्रतिष्ठा न्यूज

युवानेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या संकल्पनेतून तासगावात भव्य शोभायात्रा… जय श्री राम म्हणत हजारो रामभक्त सहभागी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या पार्श्वभूमीवर तासगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तासगाव कवठे महांकाळ भाजपा विधानसभा प्रमुख प्रभाकर बाबा पाटील यांच्या संकल्पनेतून तासगावात रविवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी सजवलेला रथ, श्री राम मंदिर प्रतिकृती यासह फटाक्यांच्या आतषबाजीत,टाळ मृदंग व पारंपरिक वादयांच्या निनादात निघालेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, यावेळी ज्योतीकाकी पाटील, शिवानीताई पाटील यांच्यासह हजारो रामभक्त उपस्थित होते.शोभा यात्रेनंतर श्री राम मंदिर याठिकाणी कारसेवकांचा सत्कार प्रभाकरबाबा यांच्या हस्ते करण्यात आला. श्री गणपती मंदिर पासून खा.संजयकाका पाटील, प्रभाकरबाबा पाटील यांच्या उपस्थितीत जय श्री राम जयघोषात या भव्य शोभायात्रेस प्रारंभ झाला. शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस, सिध्देश्वर चौक, कोकणे कॉर्नर, वरचेगल्ली, लुगडे गल्ली, संतसेना महाराज मंदिर, ढवळवेस, सोमवार पेठ, दाणेगल्ली, माळीगल्ली, विटानाका, स्टॅन्ड चौक, बागणे चौक, वंदेमातरम चौक या मार्गावरून निघून श्री राम मंदिर येथे या शोभायात्रेची सांगता झाली. यावेळी शोभायात्रा मार्गावर भगवे पताके,भगवे ध्वज लावण्यात आले होते,तर सजवलेला रथ, अयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिकृती यासह फटाक्यांच्या आतषबाजीत टाळ मृदंग व पारंपरीक वाद्यांच्या निनादात भगव्या टोप्या, भगवे स्कार्प घालून तरुण,लहान मुले, महिलांच्या उपस्थितीत निघालेल्या या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शोभायात्रेत ज्योतीकाकी पाटील, शिवानीताई पाटील, बाबासाहेब पाटील, दिग्विजय पाटील, जाफर मुजावर, अनिल कुत्ते, संतोष बेले, किशोर गायकवाड, हणमंत पाटील, विकासनाना पाटील, संदीप सावंत, प्रताप खानापुरे, दिलीप जोगळेकर, जगदीश कालगावकर, आदी सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.