प्रतिष्ठा न्यूज

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त विविध उपक्रमात खासदार संजयकाका पाटील यांनी घेतला सहभाग

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : खासदार संजयकाका पाटील यांनी जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त सांगली मिरज येथील विविध उपक्रमात सहभागी होत जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या.

सांगली येथे भव्य पालखी मिरवणुकीत सहभागी होत संजयकाका पाटील यांनी पालखी वाहक होऊन पुण्यार्जन केले.
यावेळी भाविकांना संबोधित करताना संजयकाका पाटील म्हणाले, भगवान महावीरांची अमूल्य शिकवण ही मानवी जीवनासाठी कल्याणकारी मार्ग आहे. या कल्याणकारी मार्गावर चाललो तरच आपण सुखी आणि संपन्न जीवन जगू शकतो. महावीरांची विचारसरणी प्रत्येकाने आत्मसात करावेत. असे आवाहन ही त्यांनी केले.

मिरज येथील श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराला भेट देऊन तेथील उत्सवात संजयकाका पाटील सहभागी झाले. जैन बांधवांना शुभेच्छा देत मंगल दर्शन घेतले. तसेच कार्यक्रमात भाविकांना जेवण वाढून पुण्यार्जन केले.
सांगली मिरजेतील विविध उपक्रमात सहभागी झाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.