प्रतिष्ठा न्यूज

पोलीस मुख्यालयातील फौजदार राठोड यांनी गोदावरी नदीत उडी मारून केला आत्महत्येचा प्रयत्न : गोवर्धन घाट पुलावरील घटना

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : येथील पोलीस मुख्य कार्यालयात कार्यरत असलेले फौजदार शेषराव राठोड यांनी आज दि. 5 जानेवारी 2023 रोज गुरुवारी दुपारी 1 वाजन्याच्या सुमारास गोदावरी नदीवर असलेल्या गोवर्धन घाट पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने एका माजी सैनिकाच्या तत्परतेमुळे ते बालंबाल बचावले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले व सध्या पोलीस मुख्य कार्यालयातील फौजदार शेषराव राठोड हे मागील काही दिवसापासून आजारी होते. त्या आजारातून ते बरे झाले होते, परंतु त्यांनी आज दि.5 जानेवारी 2023 रोज गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदी पात्रात गोवर्धन घाट पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, विशेष म्हणजे ते 50 फूट उंचीवरून खाली नदीपात्रातील पाण्यात पडले. मात्र “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणी प्रमाणे यावेळी याच परिसरात माजी सैनिक असलेल्या एका युवकाने स्वतःच्या जिवाची परवा न करता तत्परता दाखवत नदी पाण्यात जाऊन त्यांना उचलून बाहेर काढले आणि लगेच विष्णुपुरी येथील शासकीय दवाखानात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या प्रकरणाची माहिती वजिराबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक जगदीश भंडरवार, कर्तव्य अधिकारी मोरे व पोलीस अधीक्षक कार्यालयात समजता अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन राठोड यांनी पुलावरून उडी का मारली याचे नेमके कारण मात्र ते शुद्धीवर आल्यावरच समजु शकेल असे पोलिसांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.