प्रतिष्ठा न्यूज

उमरा ग्रामपंचायती मध्ये स्वप्नील पाटील उमरेकर यांची एक हाती सत्ता तर कौडगाव मध्ये सरपंच पद विरोधी गटाकडे

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा व कौडगाव येथे दि 18 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या चुरशीच्या ग्रामपचायत निवडणूकीत आतापर्यतचे सर्वाधिक म्हणजे उमरा येथे 92 टक्के तर कौडगाव येथे 96 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. त्याचा निकाल 19 सप्टेंबर रोजी लागला असुन या निवडणूक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते . त्यात मतदारांनी उमरा येथील ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख स्वप्नील पाटील उमरेकर पॅनलचे सर्वच्या सर्व 13 पैकी 13 उमेदवारानी विजय संपादन करत एक हाती सत्ता मिळवली आहेे . तर तर माजी सरपंच ब्रह्मानंद सिरसाट यांचे गटाला भोपळाही फोडता आला नाही. तर कौडगााव येथे कामाजी पाटील भरकडे यांचे गटाने सरपंच पदासह दोन जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी गटाचे गंगाधर पाटील भरकडे परिवर्तन पॅनलला पाच जागा मिळाल्या आहेत . मात्र सरपंचपद विरोधी गटाकडे देत मतदारांनी दे धक्का निकाल दिला आहे .
उमरा येथे 13 पैकी 13 जागा स्वप्नील पाटील उमरेकर व सरपंच पदाचे उमेदवार साईनाथ पवार यांचेसह एक हाती सत्ता मिळवत विरोधी गटाचेच माजी सरपंच ब्रम्हानंद सिरसााट गटाचा धुवा उडाला असून त्यांना भोपळा ही फोडता आला नाही. त्यात विजयी उमेदवार साईनाथ पवार , सचिन सिरसाट , रुक्‍मीनबाई जाधव , स्वप्निल पाटील उमरेकर ,आशा सिरसाट, शेेख कैकशा , सुनील सोनटक्केेेे, प्रयागबाई चव्हाण , सावित्रीबाई राठोड , सतिश राठोड, शेषाबाई पवार , संतोष पवार , गोविंद राठोड , सारजाबाई पवार हया विजयी झाल्या.
तर कौडगावात येथे 7 पैकी 5 जागा गंगाधर पाटील भरकडेे यांच्या गटाने जिंकल्या पण सरपंच पदाचे उमेदवार विरोधी गटाकडे गेल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला .कामाजी भरकडे यांच्याा गटाने सरपंच पदासह अन्य दोन जागा जिंकल्या असूूून त्याात सरपंच पदाचे उमेदवार कुसुमबाई भरकडे, शांताबाई भरकडे , गोपीनाथ खानसोळे यांचा विजय झाला आहेत. तर प्रतिस्पर्धीी गटाचे गंगाधर भरकडे यांच्याा गटाकडे पुढील पाच जागा गेले आहेत. त्यामध्ये सुनिताा भरकडे ,लक्ष्मीबाई भरकडे ,विलास भरकडे, ताई जोंधळे, चांदु दर्शने यांना स्पष्ट बहुमत मिळाले मात्र त्यांची सरपंच पदाची संधी हुकली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.