प्रतिष्ठा न्यूज

तासगावात श्री.शिवप्रतिष्ठानचें धारकरी आक्रमक : जशास तसे उत्तर देण्याचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे (गुरुजी) हे श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान या संघटनेचे संस्थापक आहेत,महाराष्ट्रातील उगवती तरुण पिढी ही पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना आदर्श मानून जगावी ही पिढी तत्वनिष्ठ,धर्मनिष्ट बनावी या ध्येयासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले आहे.गुरुजी दररोज अनेक ठिकाणी सभा बैठकीसाठी सांगली मधून येजा करत असतात हिंदूत्ववादी विचार म्हणजे जातीयवादी विचार मानणान्या अनेक व्यक्ती संघटना त्यांना फक्त विरोधाला विरोध करत असतात.दि.२९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास गुरुजी नाशिक जिल्हयातील मनमाड येथील नियोजित कार्यकम संपवून धुळे येथे जात असताना काही पळपुट्या, विचारशून्य व स्टँटबाजी करणारे संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणिव नसणा-या टोळक्याने गुरुजी बसलेल्या वाहनावर हल्ला केला घोषणाबाजी करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.परंतु या पळपुट्या विचारशून्य टोळक्याचा आम्ही श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी संयमी भावनेत निषेध करतो.हा सर्व प्रकार पाहता गाडीच्या आडवा येणारा जमाव हा पुर्वनियोजित कट होता,तसेच आदरणिय गुरुजींच्यावर हल्ला करण्याचा कपटी डाव होता असे दिसून येते.देश देव आणि धर्मासाठी असंख्य धारकांची फौज गुरुजीनी निस्वार्थ भावनेनी उभे केलेली आहे तरी गुरुजीच्यावर अशा प्रकारचा हल्ला होऊ नये यासाठी गुरुजींना लवकरात लवकर पोलीस संरक्षण देण्यात यावे असे निवेदन आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगावच्या वतीने तासगाव पोलीस स्टेशन, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. यावेळी मोठया संख्येने धारकरी उपस्थित होते.यावेळी बोलताना धारकाऱ्यांनी गुरुजींवर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकाचा निषेध करून इथून पुढच्या काळात जशास तसें उत्तर देण्याचा इशारा देऊन तीव्र भावना व्यक्त केल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.