प्रतिष्ठा न्यूज

मुलांना घडवणं आजच्या काळातील सगळ्यात मोठ आव्हान : सागर चव्हाण

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील युनिक अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरच्या अॅबॅकस स्पर्धा पार पडल्या.यामध्ये जवळपास राज्यभरातील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सकाळच्या सत्रामध्ये परीक्षा पार पडली आणि दुपारच्या सत्रामध्ये पारितोषक वितरण सोहळा पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर, तासगाव चे प्राचार्य विजय पाटील सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक व प्रतिष्ठा फाउंडेशनच्या युवा रत्न पुरस्कार प्राप्त मा.सागर चव्हाण उपस्थित होते.प्रमुख उपस्थिती म्हणून मिरज तालुका कृषी अधिकारी मा.सुषमा जाधव मॅडम,पंचायत समिती तासगावच्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी मा.शोभा जाधव मॅडम,शंकर वैद्य गुरुजी,संतोष जाधव आणि सुखदेव पवार गुरुजी उपस्थित होते.यावेळी प्रमुख पाहुणे विजय पाटील सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तर सागर चव्हाण यांनी देखील अध्यक्षीय भाषनातं आज कालच्या मुलांना सगळं द्या,पण ते देत असताना परिस्थितीचीहि जाणीव करुन द्या, मुलांचा हट्टीपणा कमी करायचा असेल तर त्यांना नाही पचवायला शिकवलं पाहिजे,मुलांना घडवणं हे आजच्या काळातील सगळ्यात मोठं आव्हान असल्याचं सांगितले.
युनिक अकॅडमी २०२१ साली सुरू झाली असून संचालक सुप्रिया पवार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कष्टाने या अकॅडमी ला उभा केले असून आज २५० पेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.