प्रतिष्ठा न्यूज

सांगली महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेत महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आणि आयुक्त सुनील पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, गटनेत्या भारती दिगडे, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे , सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, कार्यशाळा अभियंता विनायक जाधव, कमलाकर कुलकर्णी, सिराज नायकवडे, मंगल फोंडे यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते. आपले राज्य गीत म्हणून मान्यता मिळालेल्या महाराष्ट्र माझा हे गीत महापालिकेचे ब्रँड अंबेसिडर दीपक चव्हाण यांनी सर्वासमोर सादर करत आजपासून हे राज्य गीत महापालिकेतही अमलात आणण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.