प्रतिष्ठा न्यूज

सांगली शहर पोलीस ठाण्याचे विभाजन होवुन नविन स्वतंत्र पोलीस ठाणेची निर्मीती करावी – माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली शहर पोलीस ठाणेची स्थापना होवुन जवळपास ५० ते ६० वर्षे झाली त्यावेळीची सांगली शहराची लोकसंख्या, लोकवस्ती याचा विचार करून पोलीस ठाणेची निर्मिती झाली होती. तसेच त्यावेळच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर सांगली शहराचा वाढलेला विस्तार, नवीन उपनगरे, गुंठेवारी भाग तसेच सांगली हे जिल्हयाचे मुख्य ठिकाण असलेने इथे प्रशासकीय कामानिमित्त, नोकरीसाठी, ग्रामीण भागातील शाळा, कॉलेज करिता येणारे विद्यार्थी, प्रशासकीय कामाचा झालेला विस्तार, लोकसंख्या वाढीमुळे पोलीसाच्यावर असणारा कामाचा ताण, अपुरे मनुष्यबळ यामुळे अलीकडील काळात गुन्हेगारीत वाढ देखील झाली आहे. सध्या सांगली शहर पोलीस ठाणेत दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे वर्षाकाठी जवळपास १००० इतके दाखल होतात तर अदखलपात्र गुन्हे १५०० च्या वर दाखल होतात, मयत, मिसींग याचेही प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पोलीसांचे बेसीक पोलींसीग होताना दिसत नाही. कारण त्याचा पुर्ण वेळ गुन्हे दाखल करण्यात आणी तपासात चाललेला आहे.

विशेष म्हणजे सांगली शहर पोलीस ठाणे नंतर विश्रामबाग (जुने मार्केट यार्ड) पोलीस ठाणे मंजुर झाले होते. त्याचेही विभाजन होवुन नंतर नवीन संजयनगर पोलीस ठाणे झाले मात्र सांगली शहर पोलीस ठाण्याचे विभाजन झाले नाही तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे व संजयनगर पोलीस ठाणे याचा क्राईम रेट पाहीला तर सांगली शहर पोलीस ठाणेचा क्राइम रेट दुप्पटीने जास्त आहे. या सर्वचा विचार करता आणी सर्वात महत्वाचे म्हणजे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याची हद्द देखील मोठी आहे. तसेच मुख्य पोलीस ठाणे पासुन वेगवेगळया चार दिशाला गांवे असल्याने एखादी घटना घडल्यास त्यांना देखील पोहचण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो त्यामुळे सांगली ग्रामीण पोलीस ठाणेच्या दक्षिणेकडील गांवे म्हणजेच इनामधामणीचा समावेश विश्रामबाग पोलीस ठाण्यात, अंकली, हरीपुर चा समावेश विभाजन होवुन नवीन होणा-या पोलीस ठाण्यात करावे. पोलीसांना देखील प्रशासकीय कामकाज करणे, नागरीकांचा वेळ, पैसा, मोठया प्रमाणावर वाचणार आहे. तरी संबंधीत सांगली शहर पोलीस ठाणेचे विभाजन होवुन नवीन पोलीस ठाणेची निर्मीती करण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली यांच्याकडे मागणी केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.