प्रतिष्ठा न्यूज

संकल्प सेवाभावी बहुउद्देशीय संस्था आरग यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : संकल्प सेवाभावी बहुउद्देशीय संस्था आरग याच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला.
वर्षाप्रमाणे सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षातील आरग हायस्कूल आरग व मालती नेमिनाथ चौगुले कन्या शाळा आरग येथील इयत्ता दहावी व बारावी आर्ट ,सायन्स ,कॉमर्स मध्ये पहिले तीन क्रमांक असणाऱ्या 26विद्यार्थ्यांचा व संस्थेचे सदस्य असणाऱ्या पालकांच्या 3 अशा 29 विद्यार्थ्यांचा सत्कार संकल्प सेवाभावी संस्थेमार्फत मुलांना वाचनीय पुस्तके शिल्ड व गुलाब पुष्प देऊनसत्कार करण्यात आला. मुलांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्यास ते विद्यार्थी आणखी पुढे जातात याला अनुसरून हा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जी एस पाटील सर माजी मुख्याध्यापक सेवा आश्रम विद्यालय लिंगनूर यांनी कार्यक्रमाचेअध्यक्ष स्थान भूषवले. मान्यवरांच्या हस्ते दीप , महात्मा फुले ,शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्तेकरून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी मालती नेमिनाथ कन्या शाळेचे प्रतिनिधी प्रदीप काळे सर, आरग हायस्कूल आरग प्रतिनिधी सौ उज्वला गुरव मॅडम उपस्थित होत्या.पांडुरंग कुंभार सर, राजकुमार पवार सर, पोपट निकम सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच संकेत मधुकर पवार या विद्यार्थ्याने नीट परीक्षेमध्ये 605 गुण मिळवल्याबद्दल त्याचाही सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. सत्कारमूर्ती विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींनी सुद्धा संस्थेबद्दल आपले आभार व्यक्त केले. जी .एस.पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेच्या कार्याबद्दल गौरवद्गार काढला. तसेच विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव सर यांनी केले बाबासाहेब पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रफिक दानवाडे, नामदेव मगदूम सर , व्ही सुतार सर, गंगाधर कोरे सर, अजित कवठेकर सर, सुरेश कुंभार, नाना विभुते, विजय कदम सर, श्रीधर कोळी सर, गणेश करेनावर , सलीम इनामदार,पत्रकार सुरज म्हेत्रे, मधुकर कांबळे सर,संकल्प सेवाभावी संस्थेचे सदस्य विद्यार्थी विद्यार्थीनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.