प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

खाडे स्कूलच्या राम आचार्य ची JEE मेन्स परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : नुकताच जेईई-मेन या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ही  परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे आयोजित केली जाते. २०२४ मध्ये या परीक्षेसाठी साधारण १२.३ लक्ष विद्यार्थी बसले होते. यातून मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या राम आचार्य याने संपूर्ण भारतातून ६२७१९ वा नंबर काढत संस्थेच्या कारकिर्दीमध्ये मानाचा तुरा खोवला आहे. रामने जेईई-मेन परीक्षेत ९६% मार्क मिळवून जेईई- ऍडवान्स परीक्षेमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. रामचे विशेष म्हणजे प्रयत्न चिकाटी आणि कष्ट याची सांगड घालत रात्रीचा दिवस करत हे यश खेचून आणले आहे. रामने यासाठी कोणतेही क्लासेस लावले नसल्याचे स्पष्ट केले आहे.  यासाठी त्याला खाडे ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. त्याचबरोबर या यशामागे आई व वडील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे रामने सांगितले.
 या मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व वद्यार्थी यांचेकडून अभिनंदाचा वर्षाव होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.