प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे सोनू बेदाणा वाशिंग नियमबाह्य,लवकरच कारवाई होणार मनसे नेते अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव येथील सोनू बेदाणा वाशिंग बेकायदेशीर रित्या कोणत्याही नियम व अटींचे पालन न करता सुरु आहे.तसेच बेदाणा वाशिंग केल्यानंतर बाहेर पडणारे घाण दुर्गन्धी युक्त पाणी हे कोणत्याही प्रोसेस विना रस्त्यावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे तेथील संपूर्ण परिसरात दुर्गन्धी पसरली  असून लोकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत मनसे नेते अमोल काळे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कडे जलप्रदूषण झाले असल्याची लेखी तक्रार केली होती, त्यानुसार प्रदूषण मंडळ अधिकारी यांनी स्वतः येऊन याबाबतचा पाहणी अहवाल सादर केला आहे,त्यात बेदाणा वाशिंग बाबतीत कोणताही नियम व अटीचे पालन झाले नसल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे येत्या 2 दिवसात सोनू बेदाणा वाशिंग वर कारवाई होणार आहे अशी माहिती मनसे नेते अमोल काळे याणी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.