प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांचा दिमाखदार निरोप समारंभ.

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जाणारा तासगाव तालुका, प्रत्येक गोष्टीत राजकारण करून पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणणारे राजकीय पुढारी गल्ली गल्लीत असताना सुद्धा त्या सर्वांशी आपुलकीने समतोल राखून स्वतःची पोलीस दलातील देवमाणूस म्हणून ओळख निर्माण करणारे तासगावचे कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील पोलीस अधिकारी असलेल्या संजीव झाडेसाहेब यांची आज मिरज शहर पोलीस पदी नियुक्ती झाली.त्यानिमित्ताने आज एक शानदार पोलीस निरीक्षक म्हणून ओळख असणारे झाडें साहेब यांचा तासगाव पोलीस ठाण्याने *दिमाखदार निरोप समारंभ* आयोजित केला होता.सरकारी अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो.पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना,तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक,यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम राहतात.अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते.अशाच एका जिगरबाज अधिकाऱ्याचा निरोप समारंभ आज तासगावात चर्चेचा विषय ठरला.निमित्त होते मिरज शहर पोलीस ठाण्याला बदली झाल्यानंतर तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडें यांचा आज झालेला निरोप समारंभ.एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम तासगाव येथे प्रथमच झाला.
गेली दीड वर्षे संजीव झाडें यांनी तासगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्या बरोबरच सर्वांना समान न्याय देऊन शहर आणि तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी केलेला प्रयत्न अतुलनीय असाच आहे.त्यामुळे नागरिकांबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले होते.आज त्यांच्या निरोप समारंभा वेळी सर्व पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी यांनी उपस्थित राहून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.सजवलेल्या गाडीतून त्यांना निरोप देण्यात आला.अत्यन्त भावुक वातावरणात झालेला सोहळा पाहण्यासाठी आणि साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी अनेक नागरिक सुद्धा यावेळी उपस्थित होते..
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.