प्रतिष्ठा न्यूज

गुरुवर्य वासुदेव केशव सावईकर प्राथमिक शाळा सांगली येथे सावईकर गुरुजींच्या जन्मशताब्दी निमित्त विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : गुरुवर्य वासुदेव केशव सावईकर प्राथमिक शाळा सांगली येथे आज सिटी हायस्कूल सांगली येथील 1996 च्या बॅचचे माजी विद्यार्थी यांनी सेवाध्यास (ध्यास सेवेचा) फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेतील 32 विद्यार्थ्यांना आज शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव मा. आनंदराव (काका) पाटील, सेवाध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष मा.अमेय फाळके, सेक्रेटरी विजय निकम, विठ्ठल सावईकर, शाळेचे मुख्याध्यापक अरविंद गावडे उपस्थित होते.
शिक्षणापासून वंचित व उपेक्षित असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना आज खऱ्या अर्थाने आम्ही मदत करू शकलो, याचे आम्हाला समाधान वाटते. अजूनही फाउंडेशनच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना आम्ही शालेय साहित्यांची मदत करणार आहोत. असे  सेवाध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमेय फाळके   यांनी सांगितले.
या फाउंडेशनच्या माध्यमातून केतन काबरा, ऐश्वर्या राठी, अश्विन जोग, शशिकांत गायकवाड, सारिका मंत्री, किरण चव्हाण, शितल नावंदर या देणगीदारांच्या रूपाने शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शैलजा पाटील यांनी केले तर आभार श्री रमेश काळे यांनी मानले. बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील, सहा. शिक्षिका निलोफर गवंडी, सुनीता वडर इत्यादी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.